BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'सापाचं डोकं छाटत आहोत'; भारतीय कंपन्यांवरील कारवाईनंतर अमेरिकेच्या मंत्र्यांचं वक्तव्य
ट्रम्प प्रशासनाचं हे पाऊल, अमेरिकेतील कंपन्यांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी एक मोठा धक्का मानलं जात आहे.
व्हीडिओ, 'MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा', छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ठाम मत, वेळ 7,27
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सत्याग्रह आंदोलन गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू आहे.
'अंबानीच भारताचे खरे बॉस आहेत का?', इलॉन मस्क यांच्या पोस्टमुळे वाद, सरकारचंही उत्तर
भारतातील सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठीची नियामक व्यवस्था निष्पक्ष असून कोणताही भेदभाव केला जात नाही, असं दूरसंचार मंत्रालयानं 8 ऑक्टोबर रोजी म्हटलं आहे.
स्मित मच्छर यांना इस्रायल देणार सर्वोच्च पुरस्कार, राष्ट्रपतींनी अशा प्रकारे केलं कौतुक
बुधवारी (30 सप्टेंबर) त्यांचं विमान तबुकच्या दिशेने वळवण्यात आलं. इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, को-पायलटने हवेत स्मित मच्छर यांच्यावर हल्ला केला आणि 174 प्रवासी असलेल्या विमानाला पाडण्याचा प्रयत्न केला.
फॅट कमी करण्याचा ट्रेंड; पण आपल्या शरीराला गरजेचीही असते चरबी, जाणून घ्या नेमकं विज्ञान
शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी असल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि लठ्ठपणा वाढू शकतो. मात्र, खूप कमी चरबी असणं देखील शरीरासाठी चांगल नाही.
नाना पाटेकर यांच्या निधनावर अभिनेत्री तनुश्री दत्ता यांची पहिली प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनावर अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
42 माजी न्यायाधीश म्हणतात 'हा निवडणूक आयोगाला कमकुवत करण्याचा प्रयत्न'
एका बाजूला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे तर दुसऱ्या बाजूला देशातील 42 माजी न्यायधीशांनी निवडणूक आयोगाची पाठराखण करणारे पत्र लिहिले आहे.
घरात 298 सोन्याच्या विटा, 20 लाख डॉलर्सची रोकड; माजी सीआयए अधिकाऱ्याने केली 1900 कोटींची फसवणूक
सरकारी वकिलांनी म्हटलं की, रश सहजपणे पैशांचं रूपांतर खरेदी-विक्री करता येणाऱ्या वस्तूंमध्ये करत होता. हे पैसे लपवण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे 'भक्कम पुरावे' असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नाशिक, अंबड बोअरवेलच्या पाण्यात विषारी क्रोमियमचे प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा 1000 पटीने जास्त
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिकाऱ्यांनी या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. अहवाल आल्यानंतरच या पाण्यात नेमकी कोणती रसायनं आहेत आणि त्यांचं प्रमाण किती आहे, हे स्पष्ट होईल.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'ज्ञानेश कुमार, राजीनामा द्या'; राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा, वेळ 1,08
मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोग कचाट्यात सापडला असून आज मंगळवारी (6 ऑक्टोबर) विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीनं केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : ठाण्यात Amazon च्या डेटा सेंटरला रहिवाशांचा विरोध का आहे?, वेळ 5,36
ठाण्यात Amazon डेटा सेंटरला रहिवाशांनी विरोध का केला? त्यावर कंपनीनं काय स्पष्टीकरण दिलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण सविस्तर
व्हीडिओ, समज-गैरसमज : महात्मा गांधी यांच्याबद्दल GenZ तरुणांना काय प्रश्न पडतात? तुषार गांधींसोबत चर्चा, वेळ 1,11,41
‘समज-गैरसमज’च्या या विशेष भागात तुषार गांधी यांच्यासोबत महात्मा गांधींच्या विचारांपासून त्यांच्या निर्णयांपर्यंत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त पैलूंपर्यंत अनेक प्रश्नांवर दिलखुलास चर्चा झाली.
व्हीडिओ, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू तर 18 जखमी , वेळ 3,06
दुर्गा उत्सवासाठी शेगाव येथून दुर्गा मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाचा आज पहाटे अपघात झाला.
व्हीडिओ, दोन दशकांपासून ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर काम; मुंबईच्या 'नॉईज मॉनिटर'ला तुम्ही भेटलात का? , वेळ 4,55
2003 पासून त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी डेसिबल लेव्हल म्हणजे आवाजाची पातळी मोजली आहे
व्हीडिओ, IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? - सविस्तर रिपोर्ट, वेळ 5,52
18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.




































































