'आधी 1,000 रुपये वीजबिल, आता फक्त 100 रुपये'; 'हे' गाव सोलर व्हिलेज कसं बनलं?

व्हीडिओ कॅप्शन, कोल्हापूर जिल्ह्यातलं शेळकेवाडी गाव, 100 टक्के सोलारने उजळलेलं गाव
'आधी 1,000 रुपये वीजबिल, आता फक्त 100 रुपये'; 'हे' गाव सोलर व्हिलेज कसं बनलं?

कोल्हापूरच्या शेळकेवाडी गावात प्रत्येक घरावर सोलर पॅनेल लावले आहेत. 500 लोकसंख्या असलेलं हे गाव आता ‘100 टक्के सोलर व्हिलेज’ बनलं आहे.

शेळकेवाडी यापूर्वी हागणदारी मुक्त गाव, बायोगॅस प्रकल्प, तसंच गुलाबी गाव म्हणून चर्चेत आलं होतं.

आता सौर प्रकल्पामुळेही फायदा होत असल्याचं गावकरी सांगतात. गावकरी स्वतःच सौर पॅनेल्सची काळजी घेतात, त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही मिळालं आहे. शेळकेवाडीप्रमाणेच साताऱ्यातील मण्याची वाडी, टाकेवाडी अशी गावही सौर गावं बनली आहेत.

रिपोर्ट, शूट आणि एडिटिंग - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)