'सगळं फ्री असेल तर लोक काम का करतील'? सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर लोक काय म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, ‘मोफत थांबवा, रोजगार वाढवा’, सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर लोक म्हणतात...
'सगळं फ्री असेल तर लोक काम का करतील'? सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर लोक काय म्हणतात?

मोफतच्या योजनांऐवजी रोजगार निर्मितीवर भर द्या, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना फटकारले आहे.

तामिळनाडूमध्ये सर्व लोकांना मोफत वीज देण्याच्या प्रस्तावासंदर्भातील एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अशी टिप्पणी केलीय.

जर सरकार लोकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोफत अन्न, गॅस आणि वीज देत राहिले, तर लोक काम का करतील?, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय.

गरिबांना मदत करणे समजण्यासारखे आहे, पण कोणताही फरक न करता सर्वांना मोफत सुविधा देणे योग्य नाही, असंही न्यायालयानं म्हटलंय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.