खालिदा झिया यांचं निधन, 'लाजाळू गृहिणी' ते बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान - असा होता प्रवास
बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं.
खालिदा यांच्या निधनाची बातमी त्यांच्या बीएनपी पक्षानं एक्स प्लॅटफॉर्मवर जाहीर केली आहे.
त्यांचे पती झियाउर रहमान बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे आणि अग्रगण्य व्यक्ती होते. ते 1977 मध्ये बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष होते.
जेव्हा खालिदा झिया राजकारणात नव्हत्या. त्यांनी स्वत:ला त्यांच्या दोन मुलांच्या संगोपनात वाहून घेतलं होतं. त्यामुळे त्यांना 'लाजाळू गृहिणी' असं म्हटलं जात होतं.
1981 मध्ये झियाउर रहमान यांची हत्या झाली. त्यानंतर मात्र खालिदा झिया राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं (बीएनपी) नेतृत्व केलं. त्या दोनवेळा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या.
पहिल्यांदा 1990च्या दशकात आणि नंतर 2000 च्या सुरूवातीच्या दशकात.
त्यांच्या या प्रवासावर टाकलेली एक नजर.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






