Video : ‘खामेनी यांचा मृत्यू’, इराणमध्ये नेमकं काय घडलं? ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणमधील सरकारी वाहिनीनं केली आहे. त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनींचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.
28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले होते. प्रत्युत्तरादाखल इराणनही युएई, कुवेत, बहारिनसह शेजारच्या देशांमध्ये हल्ले केले होते.
त्यानंतर भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला. "इतिहासातील सर्वात वाईट लोकांपैकी एक असलेले खामेनी आता मरण पावलेले आहेत," असं ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं.
इराणमध्ये रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या जवळची मानली जाणारी वृत्तसंस्था फार्स न्यूजनं आधी त्या वृत्ताचं खंडन केलं होतं आणि हा अमेरिकेच्या सायकॉलॉजिकल वॉरचा भाग असल्याचं म्हटलं होतं.
मात्र काही वेळानं इराणच्या सरकारी वाहिनीनं खामेनींच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. तसंच खामेनी यांच्या मृत्यूनंतर 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






