भिल आदिवासी समाजातील शंकरची अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी निवड कशी झाली?

व्हीडिओ कॅप्शन, भिल आदिवासी समाजातील शंकरची अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी निवड कशी झाली?
भिल आदिवासी समाजातील शंकरची अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी निवड कशी झाली?

26 वर्षांचा शंकर अरूण भिल. भिल्ल आदिवासी समाजातील शंकरची नुकतीच अमेरिकेतल्या प्रतिष्ठित विद्यापीठात पीएचडीसाठी निवड झालीय. शंकर जळगाव जिल्ह्यातल्या नागझिरी गावात राहतो. गावात शिक्षण आणि नोकरीचं प्रमाण नसल्यात जमा. शंकरचे वडील सालगडी म्हणून काम करायचे. शंकर अकरावीत असताना त्यांचं निधन झालं. शंकरची आई आणि भाऊ मजुरी करतात. आईने मजुरी करून शंकरला शिकवलं. अशा परिस्थितीत शंकर इथपर्यंत कसा पोहचला?

  • रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा – किरण साकळे
  • एडिट - अरविंद पारेकर