कोल्हापुरी चपलेसाठी चामडे कमवणाऱ्या ढोर समाजाचा पारंपरिक व्यवसाय नामशेष होतोय का?
कोल्हापुरी चपलेच्या इतिहासापेक्षा ढोर समाजाचा कातडी कमावण्याचा व्यवसाय फार जुना आहे.
महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि इतर भागांत पूर्वी कातडी कमवण्याचे कारखाने होते. शाहू महाराजांच्या काळात या व्यवसायाला राजाश्रयही मिळाला होता.
मात्र, आज हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्रातील चर्मोद्योग बंद पडण्यामागे अनेक कारणं आहेत. काळानुसार आधुनिक बदल न केल्यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या.
जातीच्या उतरंडीमुळे ढोर समाज आणि त्यांचा व्यवसाय पूर्वी गावाच्या वेशीबाहेर असायचा. मात्र आता गावे विस्तारली आहेत. त्यामुळे या उद्योगातून येणारा उग्र वास आणि सांडपाण्यामुळे गावकऱ्यांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात.
या पार्श्वभूमीवर हा उद्योग टिकवून ठेवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे.
पाहा बीबीसी मराठीचा खास ग्राउंड रिपोर्ट
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी






