मुंबई महापालिका जिंकणं ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तिवाची लढाई आहे?
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला चांगलं यश मिळालं, मात्र विधानसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुंबई जिंकणं हे शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणं ही जमेची बाजू मानली जात असली, तरी मुंबईसमोरचे प्रश्न गंभीर आहेत. हवा, पाणी आणि प्रवास यांसारख्या मूलभूत समस्या मुंबईकरांना दररोज भेडसावत आहेत.
मुंबईसाठी आदित्य ठाकरे यांचं नेमकं नियोजन काय आहे? वाढतं प्रदूषण कसं आटोक्यात आणलं जाणार? सर्वसामान्य मुंबईकरांना घर घेणं शक्य होणार आहे का?
या आणि अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी सविस्तर संवाद साधला आहे. पाहा ही विशेष मुलाखत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



