परभणीत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये काय घडलं? – ग्राऊंड रिपोर्ट
परभणीत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये काय घडलं? – ग्राऊंड रिपोर्ट
परभणीतल्या सहजपूर-जवळा गावात शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या दरम्यान पोलीस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देणार नाही, असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
प्रशासकीय यंत्रणेनं पोलीस बळाचा वापर करुन मोजणी प्रक्रिया पूर्ण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर, या मोजणीदरम्यान कुठल्याही प्रकारे बळाचा वापर करण्यात आला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे, अमोल लंगर
एडिट – मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.)






