बीबीसी न्यूज मराठीचं गोपनीयता धोरण
तुमचा विश्वास आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ बीबीसी तुमच्या वैयक्तिक माहितीचा खाजगीपणा तथा गोपनीयता आणि सुरक्षितता याचे संरक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे. ही सूचना वाचणे तुमच्या साठी महत्त्वाचे आहे, की जेणेकरून आम्ही अशी वैयक्तिक माहिती कशी आणि का वापरत आहोत याची तुम्हाला जाणीव होईल. तुमचा आमच्याबरोबर झालेल्या आंतरसंबंधांदरम्यान आणि नंतरही आम्ही तुमच्याबद्दलची वैयक्तिक माहिती ही लागू असणारे माहिती-आकडेवारी म्हणजेच डेटा संरक्षणाचे कायदे यांच्यानुसार व अधीन राहून, कशी गोळा करतो आणि ती कशी वापरतो, याचे वर्णन सदर गोपनीयता सूचनेमध्ये आहे.
कृपया याची जाणीव ठेवा की, कलेक्टिव्ह न्यूजरूम प्रायव्हेट लिमिटेड ("कलेक्टिव्ह न्यूजरूम") या नावाची एक नवीन, स्वतंत्र, भारतीय मालकीची कंपनी ही आता बीबीसीच्या सहा भारतीय भाषा सेवांप्रणालींवर प्रकाशित करण्यासाठीचा विषय-मजकूर हा संपादित करेल आणि त्या प्रणालीवर तो प्रकाशित करेल. याचा अर्थ असा होतो की, सदर कलेक्टिव्ह न्यूजरूमला सदर सहा भारतीय भाषा सेवांप्रणालीवर प्रकाशित करण्यासाठीचा विषय-मजकूर संपादित करणे आणि प्रकाशित करणे हे शक्य आणि सुनिश्चित व्हावे यासाठी आता सदर विषय-मजकूराचे योगदानकर्ते, बीबीसीचे वेबसाइट म्हणजेच संकेतस्थळ याचा वापरकर्ते, आणि इतरांबद्दलची वैयक्तिक माहिती ही बीबीसी आणि सदर कलेक्टिव्ह न्यूजरूम हे एकमेकास देतील आणि सामायिक करतील. माहिती-आकडेवारी म्हणजेच डेटा याचे एक विश्वस्त म्हणून कलेक्टिव्ह न्यूजरूम तुमच्या वैयक्तिक माहितीची काळजी कशी घेते याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया माहितीची गोपनीयता तथा खाजगीपणा या संदर्भातील त्यांचे धोरण म्हणजेच त्यांचे गोपनीयता धोरण हे Privacy policy @CNR (collectivenewsroom.com) येथे पहावे.
बीबीसी कोणती वैयक्तिक माहिती प्राप्त करेल आणि आम्ही ती माहिती कशी वापरणार?
लागू होणाऱ्या कायद्यांन्वये पूर्वसुचनेशिवाय माहिती गोळा करण्याची मुभा जेव्हा केव्हा आम्हाला असेल ते वगळता अन्यथा इतर प्रसंगी तुमची वैयक्तिक माहिती आम्हाला का हवी आहे आणि आम्ही ती कशी वापरू याचा तपशील आम्ही ती माहिती गोळा करण्यापूर्वीच देऊ.
अ) अशी माहिती जी तुम्ही आम्हाला देता
सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही बीबीसीच्या वेबसाइट्सला तथा संकेतस्थळाला भेट देता आणि आमच्या सेवा वापरता, जसे की बातम्या प्रक्षेपण, थेट संभाषण, संदेश आणि स्पर्धेतील सहभाग, तेव्हा आम्ही तुम्हाला तुमचे नाव, ईमेल पत्ता, पत्रव्यवहारचा पत्ता, वय, दूरध्वनी किंवा मोबाइल नंबर नमूद करण्यास सांगू.
तुम्ही आमच्यासोबत सामायिक केलेल्या टीका-टिप्पणी किंवा चलचित्रफीत ("निर्मिती") या मध्ये दिसून येणारी इतर माहिती, जसे की लोकांची नावे, टोपणनावे, चेहरे, छायाचित्रे, आवाज, दृकश्राव्य मुद्रणे आणि तत्सम गोष्टीदेखील तुम्ही आम्हाला दिलेल्या माहितीचा एक भाग असेल.
तुमचे वय 16 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असल्यास (किंवा लागू कायद्यानुसार विहित असे सज्ञानतेचे वय), कृपया बीबीसी वेबसाइट तथा संकेतस्थळावर प्रवेश करण्यापूर्वी आणि तुमची वैयक्तिक माहिती आमच्याकडे प्रदान करण्यापूर्वी तुमच्या आई-वडिलांची किंवा पालकांची संमती घ्या. या संमतीशिवाय तुम्हाला बीबीसीच्या वेबसाइट तथा संकेतस्थळावर प्रवेश करण्याची आणि तुमची वैयक्तिक माहिती आम्हाला प्रदान करण्याची परवानगी नाही.
ब) संगणकीय-साधन व उपकरणाची माहिती
जेव्हा तुम्ही बीबीसीच्या संकेतस्थळांना भेट देता, तेव्हा तुमच्या संगणकीय-साधन उपकरण आणि तुमच्या वेब ब्राउजर म्हणजेच इंटरनेट म्हणजेच संगणकीय जाळे यावरील उपलब्ध माहिती पाहण्यासाठी उपयोगी ठरणारी संगणक प्रणाली याद्वारे आणि त्यासंदर्भातील कुकीज आणि ट्रॅकिंग म्हणजेच मागोवा घेणे आणि लक्ष्य-अनुसरणासाठीचे वेब ब्राउजर मधील इतर तंत्रज्ञान याअन्वये आम्ही काही तांत्रिक माहिती आपोआप गोळा करतो.
- इंटरनेट प्रोटोकॉल आयडी तथा क्रमांक
- संगणकीय-साधन व उपकरणाचा आयडी तथा क्रमांक
- अॅपचा आयडी तथा क्रमांक
- विक्रेत्याचा आयडी तथा क्रमांक
- जाहिरातीचा आयडी तथा क्रमांक
बीबीसी माझ्याबद्दलची ही माहिती कशी वापरेल?
आम्ही तुमची माहिती खालील प्रकारच्या कामांसाठी वापरतो.
- आमच्या सेवा वितरीत करणे आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती प्रदान करणे
- तुमच्या निर्मितीचा वापर करणे. तुम्ही आमच्या कार्यक्रमांसाठी योगदान देत असताना बीबीसी तुमची वैयक्तिक माहिती कशी हाताळेल याच्या संबंधातील माहिती मिळविणे करिता कृपया आमची योगदानकर्त्यांसाठीची गोपनीयता सूचना पहा.
- बातम्या, प्रस्ताव आणि जाहिरातींच्या संदर्भात तुम्हाला ई-मेल पाठविणे
- तुमच्या विनंत्या, तक्रारी आणि चौकशी यांना हाताळणे आणि सोडवणे
- तुम्हाला आमच्या सेवांवर जाहिरात दाखवणे आणि त्या किती प्रभावी आहेत हे जाणून घेणे
- आमची उत्पादने आणि सेवा यांचे सोशल मीडियावर म्हणजेच सामाजिक माध्यमाद्वारे मार्केटिंग तथा विपणन करणे
- तुम्ही कोणत्या प्रकारच्या सेवा वापराल हे जाणून घेण्यासाठी तुमची मदत घेणे
- संशोधन आणि नवनिर्मितीसाठी बीबीसीला सक्षम करणे
तुम्ही बीबीसीला दिलेली माहिती ही आम्ही विविधप्रकारे तथा प्रयोजनासाठी, की ज्यामध्ये सेवा व्यवस्थापन आहे, यासाठी वापरतो. याचा अर्थ असा होतो की ज्या सेवेसाठी तुम्ही बीबीसीकडे नोंदणी केली आहे त्या संदर्भात बीबीसी तुमच्याशी संपर्क करू शकते.
कृपया याची जाणीव ठेवा की, तुम्ही जर आम्हाला आक्षेपार्ह, अयोग्य किंवा आक्षेपार्ह मजकूर पाठवल्यास, परिस्थितीनुसार आम्ही तुमच्या वर्तनाची तपासणी करण्यासाठी किंवा तृतीय पक्षांकडे (लागू कायद्यानुसार परवानगी दिल्याप्रमाणे) तक्रार करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करू शकतो.
बाह्य लिंक तथा दुवे
आम्ही कधीकधी बीबीसीच्या नसलेल्या संकेतस्थळांशी लिंकद्वारे जोडले जातो. आणि आम्ही कधीकधी आमच्या सेवा त्या बाह्य संकेतस्थळांच्याद्वारे देतो - जेव्हा तुम्ही सामाजिक माध्यमे म्हणजेच सोशल मीडिया द्वारे आमच्याशी संपर्क करता, तेव्हा लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी:
- आम्ही ज्या संकेतस्थळांशी सदर लिंकद्वारे जोडले जातो त्याला आमचे समर्थन तथा मान्यता नसते
- तुम्ही त्यांचा वापर केल्यास तुमच्या बाबतीत घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही त्यांच्या विषय-मजकूरासाठी जबाबदार नाही किंवा बांधीलही नाही
- तुम्ही किंवा इतर कोणीही लिंक असलेली एखादी गोष्ट शेअर तथा सामायिक करत असल्यास, त्या सदर लिंक करत असलेल्या वेबसाइट म्हणजेच संकेतस्थळावरील कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही जबाबदार नाही
- बाह्य साइट्स म्हणजेच संकेतस्थळाच्या स्वतःच्या वापराच्या अटी आणि गोपनीयता सूचना असाव्यात, आणि आम्ही तुम्हाला अशा वेबसाइट्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते वाचण्यासाठी प्रोत्साहित करतो
बीबीसी माझी वैयक्तिक माहिती इतरांना कधी देते आणि सामायिक करते?
आम्ही तुमची माहिती इतरांसोबत तेव्हाच सामायिक करतो, जेव्हा:
- तुम्ही काहीतरी विषय-मजकुराचे सार्वजनिक प्रगटीकरण करता
- आम्ही आमच्या सेवा सक्षम करण्यासाठी इतर कंपन्यांचा वापर करतो
- जाहिरात कंपन्या वेबपृष्ठावरची जाहिरातीची जागा खरेदी करतात आणि त्यांच्या जाहिराती वैयक्तिकृत करतात
- आम्ही बीबीसी समूहातील कंपन्यांबरोबर वैयक्तिक माहिती सामायिक करतो
- आम्ही आमच्या अधिकृत सेवा प्रदाते आणि अधिकृत तथा नियुक्त केलेल्या पक्षांबरोबर वैयक्तिक माहिती सामायिक करतो, जसे की कलेक्टिव्ह न्यूजरूम
- आम्ही सहयोगाने संशोधन करतो
- कायद्यानुसार आम्हाला तुमची माहिती इतर संस्थांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असते
जी माहिती बीबीसी माझ्याबद्दल गोळा करते, ती किती काळ त्यांच्याकडे राहिल?
तुम्ही आम्हाला जेव्हा कोणतीही वैयक्तिक माहिती देता तेव्हा आम्ही ती आमच्या कॉर्पोरेट तथा निगमित प्रतिधारण वेळापत्रकानुसार टिकवून तथा साठवून ठेवतो. आम्ही या तत्त्वांचे पालन करतो:
- तुम्हाला विशद केलेल्या कामांसाठी आवश्यक तेवढ्या कालावधीपुरतीच फक्त किंवा आमच्याकडे तसे वैध कारण असल्यासच आम्ही तुमची माहिती टिकवून तथा धरून ठेवतो
- गोळा केलेली ती माहिती कोणत्या प्रकारची आहे, किती प्रमाणात गोळा केलेली आहे, किती संवेदनशील असू शकेल आणि कोणत्याही कायदेशीर आवश्यकता या संदर्भात आम्ही विचार विमर्श करतो
- लागू कायद्यानुसार किंवा आवश्यक असेल त्यापेक्षा जास्त काळ आम्ही तुमची माहिती आमच्याकडे ठेवत नाही
- तुमच्या टिकवून तथा धरून ठेवलेल्या वैयक्तिक माहिती संदर्भात तुम्ही जर आमच्याकडे विचारणा केली तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ आणि लागू कायद्यानुसार असे करण्याची आम्हाला परवानगी आहे
आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कुठे साठवतो?
बीबीसी ही एक जागतिक प्रसार माध्यम संस्था आहे ज्याचे मुख्यालय यूके मध्ये आहे. काही कंपन्या, ज्या आम्हाला सेवा देतात, त्यांच्या सेवा आणि कामकाज ह्या भारत, यूके किंवा युरोपियन इकॉनॉमिक एरिया तथा यूरोपीय आर्थिक क्षेत्र (इ इ ए म्हणजेच EEA) च्या बाहेरून चालवतात. परंतु आम्ही त्यांच्या सुरक्षिततेच्या दर्जा वर समाधानी असल्यासच तसे होऊ देतो. हे लक्षात घ्यावे की, जेव्हा तुम्ही वैयक्तिक माहिती आम्हाला देता तेव्हा, लागू कायद्यानुसार असे पारेषण प्रतिबंधित नसल्यास, सादर माहिती ही भारत, युके किंवा इ.इ.ए. तथा EEA बाहेरील ठिकाणी पाठवली जाऊ शकते, संग्रहित केली जाऊ शकते किंवा त्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते.
माझे अधिकार काय आहेत?
लक्षात ठेवा की, तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या नियंत्रणात आहे. तुम्हाला याचा अधिकार आहे:
- तुमच्या माहितीची प्रत मिळवणेसाठी विनंती करणे
- यंत्रमानवांस तुमच्याबद्दल मोठे निर्णय घेऊ न देणे
- आम्हाला चुकीची माहिती दुरुस्त करण्यास सांगणे, ती हटवणे किंवा आम्ही ती फक्त काही विशिष्ट हेतूंसाठी वापरण्याची विनंती करणे
- तुमचा विचार बदलल्यास तुमची माहिती वापरण्यापासून आम्हाला थांबण्यास सांगणे.
- वैयक्तिकृत जाहिरातीसंदर्भातील वेब ब्राउजरच्या कुकीज आणि इतर ट्रॅकिंग प्रणालीमधून बाहेर पडणे
कृपया लक्षात ठेवा, कधीकधी आम्ही मदत करू शकत नाही. जसे की, कायदाच जर का आम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर सुरू ठेवण्यास, ज्यामध्ये पत्रकारितेच्या हेतूंचा समावेश होतो, परवानगी देत असेल तर, अन्यथा जर का कायदाच आम्हाला प्रतिबंधित करत असेल तेव्हा आम्ही त्याचा वापर करू शकत नाही.
मला अधिक माहिती कुठे मिळेल?
BBC च्या गोपनीयता आणि कुकीज धोरणाची संपूर्ण आवृत्ती पाहण्यासाठी, कृपया The BBC Privacy and Cookies Policy (outside the UK) – Using the BBC हे संकेतस्थळ पहा
बीबीसी तुमची वैयक्तिक माहिती कशी हाताळते याबद्दल तुम्हाला प्रश्न असल्यास किंवा तुम्हाला तुमच्या अधिकारांबद्दल अधिक तपशील जाणून घ्यायचे असल्यास, dataprotection.officer@bbc.co.uk वर तुम्ही आमच्या माहिती संरक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधू शकता.
कलेक्टिव्ह न्यूजरूम तुमची वैयक्तिक माहिती कशी हाताळते याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास, info@collectivenewsroom.com वर कृपया त्यांच्या माहिती संरक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.



















