नांदेड माळेगाव यात्रा : 400 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा खास का आहे?

व्हीडिओ कॅप्शन, नांदेड माळेगाव यात्रा : 400 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा खास का आहे?
नांदेड माळेगाव यात्रा : 400 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा खास का आहे?

माळेगाव. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातलं गाव. दरवर्षी इथं खंडोबाची यात्रा भरते. परंपरेनं मराठी महिन्यानुसार मार्गशीर्ष अमावस्येला ही यात्रा सुरू होते.

माळेगावच्या खंडोबाची यात्रा जवळजवळ 400 वर्षांची परंपरा असलेली यात्रा आहे. शेतकरी, गोरगरीब आणि जे भटके-विमुक्त आहेत, या सगळ्यांसाठी ती यात्रा फार आकर्षणाचा विषय असते.

दक्षिण भारतातली मोठी यात्रा म्हणून ही यात्रा गणली जाते. या यात्रेत महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश या राज्यांमधून भाविक आणि व्यापारी येतात.

दरवर्षी 18 ते 20 लाख भाविक आणि 10 ते 15 हजार व्यापारी इथं येत असल्याचं सांगितलं जातं. या यात्रेत 1 रुपयांच्या सुईपासून ते दीड कोटी रुपयांपर्यंतचा घोडा पाहायला मिळतो. काय आहे या यात्रेचं वैशिष्ट्ये? इतर यात्रांपेक्षा ही यात्रा वेगळी कशी आहे? पाहा हा स्पेशल रिपोर्ट.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे

शूट – किरण साकळे

एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)