बांगलादेशात दीपू दास या हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या, कुटुंबाची मागणी काय?

व्हीडिओ कॅप्शन, बांगलादेशात दिपू दास या हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण, कुटुंबाची मागणी काय?
बांगलादेशात दीपू दास या हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या, कुटुंबाची मागणी काय?

अलीकडेच, बांगलादेशमध्ये एका 28 वर्षीय हिंदू व्यक्तीची जमावाने हत्या केली. दीपू चंद्र दास एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धार्मिक अपमानाच्या आरोपाखाली जमावाने त्याला मारहाण करून ठार मारलं. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला.

26 डिसेंबरपर्यंत या प्रकरणासंदर्भात 18 जणांना अटक करण्यात आली होती. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कुटुंबाला न्याय मिळण्याचे आश्वासन दिलं आहे.

बांगलादेशमध्ये वाढत्या तणावाच्या वेळी हे घडलं. हा ग्राउंड रिपोर्ट बांगलादेशातील बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित आणि देवाशिष कुमार यांनी तयार केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)