तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं होतं?

व्हीडिओ कॅप्शन, तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं?
तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं होतं?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि डेरेक ओ'ब्रायन यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं, तो हा क्षण.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे हे खासदार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत होते.

तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे की, केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या मदतीने पक्षाची महत्त्वाची कागदपत्रं बळकावण्याचा प्रयत्न केला.

8 जानेवारीला तृणमूल काँग्रेसची सल्लागार संस्था आय-पॅकचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कोलकात्यातील घरावर धाड टाकण्यात आली. त्या वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः ताफ्यासह तिथे पोहोचल्या होत्या.

तिथे ममता बॅनर्जींनी दावा केला की ईडीने पक्षाचा महत्त्वाचा डेटा असलेल्या हार्ड डिस्क्स आणि पक्षाची महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीतल्या पोलीस कारवाईनंतर ममता बॅनर्जींनी X वर पोस्ट करत म्हटलं की "आमच्या खासदारांना देण्यात आलेल्या वागणुकीचा मी तीव्र निषेध करते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)