गोसीखुर्द बॅकवॉटरचा फटका- 'आता तर गावात पाण्यासोबत साप- मेलेली डुक्करं येतात'

व्हीडिओ कॅप्शन, गोसीखुर्द बॅकवॉटरचा फटका- 'आता तर गावात पाण्यासोबत साप- मेलेली डुक्करं येतात'
गोसीखुर्द बॅकवॉटरचा फटका- 'आता तर गावात पाण्यासोबत साप- मेलेली डुक्करं येतात'

गोसीखुर्दच्या बॅकवॉटरमुळे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील तब्बल 42 गावांमध्ये बाधित कुटुंब आहेत. दवडीपार आणि कारधा ही त्यापैकी दोन गावं.

कागदोपत्री ही गावं ‘पूरबाधित’ म्हणून दाखवली जातात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात धरणाचं पाणी वर्षभर शिरत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

गोसीखुर्द धरण प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे शेतजमीन पाण्याखाली जाते, धान आणि इतर पिकांचं नुकसान होतं, तर ढीवर समाजाच्या मासेमारी व्यवसायावरही मोठा परिणाम झालाय. 'लेकरांना शिक्षण शिकवू की घर बांधू, लग्न करू की पोट भरू?' असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

20 वर्षांपूर्वी काहींना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला, पण उरलेली शेतीही आता पाण्याखाली जातेय. त्यामुळे पुनर्वसनाची मागणी जोर धरतेय. मात्र, सरकारी यंत्रणा ही गावं ‘पूरग्रस्त’ असल्याचं सांगत आपत्ती व्यवस्थापनातून मदत देण्याचा मुद्दा पुढे करते. ग्रामस्थांचा सवाल आहे की धरणाचं पाणी घरात येत असताना आम्ही फक्त पूरग्रस्त कसे?

गोसीखुर्द प्रकल्पाला 38 वर्षे उलटली, खर्च वाढत गेला. धरण परिसरातील लोकांचे प्रश्न जवळपास चार दशकांत अधिक जटील झाले आहेत.

रिपोर्ट- भाग्यश्री राऊत

शूट- मनोज आगलावे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.