उमर खालिदला सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर त्याचे वडील काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, उमर खालिदला जामीन का नाकारला? सुप्रीम कोर्ट निर्णयावर वडील म्हणाले...
उमर खालिदला सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर त्याचे वडील काय म्हणाले?

दिल्ली दंगलीप्रकरणी विद्यार्थी नेता व जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा (जेएनयु) माजी विद्यार्थी उमर खालिदला सर्वोच्च न्यायालयानं जामीन नाकारला आहे. उमर खालित आणि शर्जिल इमाम या दोघांना जामीन फेटाळण्यात आला तर इतर 5 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

उमर खालिदसह सात आरोपींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय आज (5 जानेवारी) निकाल दिला. आरोपींमध्ये उमर खालिदसह, शरजील इमाम, गुल्फिशा फातिमा आणि इतर चार आरोपींचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

कोर्टाच्या या निर्णयानंतर बीबीसी मराठीचे प्रतिनिधी उमंग पोद्दार यांनी उमर खालिदच्या वडिलांशी चर्चा केली.