इंदूरमध्ये दूषित पाणी पिल्यानं अनेकांचा मृत्यू, शेकडो आजारी; जाणून घ्या काय घडलं
इंदूरच्या भगीरथपुरामध्ये मंगळवारू दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक आजारी पडले.
मध्य प्रदेश सरकारचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1400 ते 1500 जणांना याची झळ बसली असून सुमारे 200 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. तर 4 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
आरोग्य विभाग, प्रशासन आणि महानगरपालिका इथल्या परिस्थितीयवर लक्ष ठेवून आहेत असंही त्यांनी यानी सांगितलं. मात्र विजयवर्गीय घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना रहिवाशांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
एका स्थानिक महिलेच्या म्हणण्यानुसार, ड्रेनेजकडे कोणी लक्ष देत नाहीये तसंच पाण्याची पाईपलाईन आहे, मात्र तिची देखरेख ठेवली जात नाहीये. दीड वर्षांपासून आपण तक्रारी केल्या तरी त्याकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोपही तिनं केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






