मुलगा सव्वा वर्षाचा असल्यापासून 'ती' त्याला डोंगर-दऱ्यांत घेऊन भटकते

व्हीडिओ कॅप्शन, निसर्गाच्या सान्निध्याचा. तिचा मुलगा अब्बास सव्वा वर्षाचा असल्यापासून ती त्याला डोंगर-दऱ्यात घेऊन भटकते, ट्रेकिंग करते
मुलगा सव्वा वर्षाचा असल्यापासून 'ती' त्याला डोंगर-दऱ्यांत घेऊन भटकते

बाळ-बाळंतिणीने असं वागावं, तसं वागावं, बाळासाठी काय चांगलं किंवा काय वाईट याचे सल्ले नवीन आईला अनेक जण देतात. पण झुबैराने तिच्या लहान मुलाला वाढवताना एक वेगळाच मार्ग निवडला...निसर्गाच्या सान्निध्याचा.

तिचा मुलगा अब्बास सव्वा वर्षाचा असल्यापासून ती त्याला डोंगर-दऱ्यात घेऊन भटकते, ट्रेकिंग करते. देवाने बनवलेलं सुंदर जग आपल्या मुलाने अनुभवावं, यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते असं तिला वाटतं.

हे सर्व ती कसं करते, हे जाणून घेण्यासाठी बीबीस उर्दूने तिच्याशी संवाद साधला.

व्हीडिओ- हसन अब्बास आणि काशिफ बाजवा

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)