राहुल नार्वेकर विरुद्ध हरिभाऊ राठोड - त्या व्हायरल व्हीडिओनंतर कारवाई होणार का?
राहुल नार्वेकर विरुद्ध हरिभाऊ राठोड - त्या व्हायरल व्हीडिओनंतर कारवाई होणार का?
नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला.
त्यासंदर्भातील एक व्हीडिओदेखील समोर आला. खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तो व्हीडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर केला होता.
यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यावरून उद्धव ठाकरेंसह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नार्वेकरांवर गुन्हा दाखल करत त्यांचं निलंबन करण्याची मागणीही केली.
या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले? त्यांच्यावर नेमके काय आरोप होत आहेत? जाणून घेऊया.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






