अमेरिकेला व्हेनेझुएला देशात इतका रस का? तिथे किती मोठे क्रूड ऑईल साठे आहेत?
अमेरिकेला व्हेनेझुएला देशात इतका रस का? तिथे किती मोठे क्रूड ऑईल साठे आहेत?
व्हेनेझुएला महत्त्वाचा का? तर तिथल्या तेलाच्या साठ्यांसाठी.
जगातला सर्वाधिक तेलसाठा या देशात आहे. किती? तर 303 अब्ज बॅरल्सचे साठे... म्हणजे एकूण जगातल्या तेलसाठ्यापैकी 20 टक्के तेल व्हेनेझुएलात असल्याचं US Energy Information Administration ने म्हटलं होतं.
व्हेनेझुएला तेलावरच तरंगतोय, असंही म्हणता येईल.
सौदी अरेबिया, इराण - इराकपेक्षाही जास्त क्रूड ऑईल व्हेनेझुएलाकडे आहे. आणि म्हणूनच अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरते.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले






