सरत्या वर्षात BBC मराठीच्या वाचकांनी कोणत्या बातम्यांना पसंती दिली, जाणून घ्या

2024 हे वर्ष अनेक महत्त्वपूर्ण राजकीय, सामाजिक, क्रीडाविषयक आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांनी गाजलं. यावर्षी महाराष्ट्र, देश आणि जगभरात घडलेल्या घटना बीबीसी मराठीने वाचकांपर्यंत पोहोचवल्या.
जून महिन्यात लागलेला लोकसभा निवडणुकीचा काहीसा अनपेक्षित निकाल, त्यानंतर काही दिवसांनी भारतीय क्रिकेट संघाने पटकावलेला टी-20 विश्वचषक, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुका, मागच्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल विरुद्ध हमास संघर्षाचं वार्तांकनही आम्ही केलं.
2024 मध्ये बीबीसी मराठीच्या वाचकांनी कोणत्या बातम्या सर्वाधिक वाचल्या? कोणत्या बातम्यांवर त्यांचा सर्वाधिक वेळ खर्च केला? यावर्षी कोणकोणत्या महत्त्वाच्या राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक घटना घडल्या? याचाच हा आढावा.


2024 मध्ये बीबीसी मराठीवर सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या
1.चांदा ते बांदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या संपूर्ण 288 उमेदवारांची यादी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. कधी नव्हे एवढं मोठं यश एखाद्या आघाडीला या निवडणुकीत मिळाल्याचं पाहायला मिळालं.
या निवडणूक निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांची नावं जाणून घेण्याची उत्सुकता बीबीसी मराठीच्या वाचकांमध्ये दिसून आली. आणि त्यासंदर्भात आम्ही केलेली बातमीच यावर्षी सर्वाधिक वाचली गेलेली बातमी ठरली. इथे क्लिक करून ती बातमी तुम्ही वाचू शकता.

2. मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू, हे 154 प्रश्न विचारले जाणार
2024 मध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ महाराष्ट्रातच नाही तर, राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांमध्ये चर्चिला गेला. मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपसलेलं उपोषणाचं हत्यार आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारी पातळीवर झालेले प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रभाव पडल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. मात्र त्याआधी सरकारने 23 जानेवारी पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु केलं होतं. या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बीबीसी मराठीने केलेली बातमी लाखो प्रेक्षकांनी वाचली.

3. भारतीय महिला आपला मेनोपॉज नवऱ्यापासून का लपवतात?
मेनोपॉज महिलांच्या आयुष्यातला तो थांबा असतो, जिथे त्यांच्या शरीरात तर अगणित बदल होत असतातच. पण मनातही अनेक भावनांचा कल्लोळ दाटलेला असतो. लाज, भीती, असुरक्षितता यांच्या द्वंदात अडकलेल्या महिला आपलं उरलेलं आयुष्य कसं जगतात?
मेनोपॉज संदर्भातील महिलांचे प्रश्न, विशेषतः मेनोपॉज कडे पाहण्याचा भारतीय समाजाचा दृष्टिकोन या विषयावर बीबीसी मराठीने केलेल्या सविस्तर बातमीला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
2024 मध्ये घडलेल्या सर्वात मोठ्या घटनांच्या संदर्भातील 'टॉप 3' बातम्या
1. लोकसभा निवडणुकीत खरंच 'मोदी फॅक्टर' किती परिणामकारक ठरला?
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये, 'नरेंद्र मोदींचं नेतृत्व' हा प्रचार अभियानाचा चेहरा बनवायचा ही भाजपाची व्यूहरचना होती. एनडीएच्या उमेदवारांनी देखील ही गोष्ट ठळकपणे सांगितली होती की, हे मत त्यांच्यासाठी नाही तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी असणार आहे.
सर्व देशभर मोदींनी फक्त भाजपाच्या उमेदवारांचाच नाही तर त्याचबरोबर एनडीएच्या उमेदवारांचादेखील प्रचार केला. निवडणूक एका नेतृत्वाभोवती फिरू नये या बाबत विरोधी आघाडी सावध होती. त्यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
2. पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणत टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 'इथे' मॅच फिरली
29 जून 2024 रोजी भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक स्वतःच्या नावे केला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रोहित शर्माच्या टीम इंडियाने दुसरा टी20 विश्वचषक भारताला मिळवून दिलाय.

फोटो स्रोत, Getty Images
3. देवेंद्र फडणवीसच 'पुन्हा' मुख्यमंत्रिपदी का? भाजपने या निर्णयासाठी एवढा वेळ का घेतला?
महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आणि त्यातही खासकरुन भाजपला बहुमताच्या जवळ जाणारा आकडा प्राप्त झाल्यानंतरही मुख्यमंत्रिपदाचं घोंगडं तब्बल दहा दिवस भिजत पडलं होतं. अखेर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली गेली.
2024 मध्ये 'या टॉप 3' बातम्यांवर बीबीसी मराठीच्या वाचकांनी त्यांचा सर्वाधिक वेळ खर्च केला
1. राजेश खन्ना यांच्या 'आशीर्वाद'ची जेव्हा 'भूत बंगला' म्हणून चर्चा झाली, पण या बंगल्यानं पाहिले दोन 'सुपरस्टार'
चित्रपट तारे-तारकांची जीवनशैली नेहमीच चर्चेचा विषय असते. असाच एक मधला काळ होता, जेव्हा फिल्म स्टारचे आलिशान बंगले यावरूनच त्यांचं स्टारडम ठरवलं जात होतं.
हे बंगले आकाशाला भिडणाऱ्या यशापासून ते नैराश्यात ढकलणाऱ्या अपयशापर्यंत, काळाच्या सर्व चक्रांचे साक्षीदार होते. मानवी जीवनातील सर्व रंग-ढंग या बंगल्यांनी अनुभवले.

फोटो स्रोत, PENGUIN PUBLISHER
2. गुरुदत्त यांनी स्वत:च का जमीनदोस्त केला त्यांचा मुंबईतील आलिशान 'बंगला नंबर 48'?
चित्रपटांची चंदेरी दुनिया ही स्वप्नांची दुनिया असते. चित्रपट बनवणारे रुपेरी पडद्यावर स्वप्नांची पाखरण करतात, तर चित्रपट पाहणारे त्या कथेच्या माध्यमातून स्वप्नं जगतात.
सर्वसामान्य चित्रपट रसिकांप्रमाणेच चित्रपटाची निर्मिती करणारे, अभिनय करणारे यांचं देखील अनेकदा सर्वात मोठं स्वप्नं म्हणजे 'स्वत:चं घर' हेच असतं.
त्यामुळेच तर प्रत्येक फिल्मस्टारच्या घराची चर्चा होते. कारण त्यांना हवा असतो - 'एक बंगला बने न्यारा सा.' मुंबईतल्या पाली हिलवरील 'बंगला क्रमांक 48' ज्या लोकांनी पाहिला ते त्या बंगल्याची भव्यता कधीही विसरू शकले नाहीत. हा बंगला होता भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकार आणि चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त यांचा...

3. असईची लढाई : मराठवाड्यातील या छोट्याशा गावातील लढाईने मराठा साम्राज्य आणि भारताचा इतिहास बदलला
मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाची अशी एक लढाई मराठवाड्याच्या भूमीवर जालन्याजवळ असई या ठिकाणी झाली होती. त्यामुळं तिला असईची लढाई (Battle of Assaye) असं म्हटलं जातं. या गावाला आसई असंही म्हटलं जातं.
2024 मध्ये आरोग्यासंदर्भात वाचल्या गेलेल्या 'टॉप 3' बातम्या
1. ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीमध्ये स्ट्रोकची लक्षणं दिसल्यास काय करावे?
भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, स्ट्रोक हे जगभरातील मृत्यूचं दुसरं मोठं कारण आहे. तसंच 2013 मध्ये यामुळं अंदाजे 65 लाख मृत्यू झाले आहेत.
आयसीएमआरनं नुकताच एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार 2016 मध्ये स्ट्रोक हे भारतातील मृत्यूच्या कारणांमधील चौथं महत्त्वाचं कारण होतं.

फोटो स्रोत, SPL
2. व्हिटिलिगो: कोड किंवा पांढरे डाग हा आजार कसा होतो? यावर काही उपाय आहेत का?
कोड किंवा पांढरे डाग हा त्वचेचा एक सामान्य आजार असूनही लोकांमध्ये आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही याची फारच कमी माहिती आहे.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, हा एक सामान्य आजार असून जगातील एकूण लोकसंख्येच्या 0.5 ते 1.0 टक्के लोक या आजाराने ग्रस्त आहेत. मात्र अनेक प्रकरणे नोंदवली जात नसल्याने हे प्रमाण लोकसंख्येच्या 1.5 टक्के असू शकतं, असा काही संशोधकांचा असा अंदाज.

फोटो स्रोत, Getty Images
3. सेक्स आरोग्यः लिंग ताठरता आणि लैंगिक क्षमता वाढण्यासाठी तुम्ही 'त्या' गोळ्या घेत असाल तर...
लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तसंच सेक्सचा कालावधी वाढवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या औषधांचं सेवन करतात. यांपैकी बहुतांश औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे. या औषधांच्या सेवनामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
अशी औषधं आपण घ्यायला हवीत का? नेमक्या कुणाला यासंदर्भात औषधोपचारांची गरज असते? अशी अनेक प्रश्न याबाबत उपस्थित होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
2024 मध्ये हवामान बदल आणि पर्यावरणाच्या बाबतीत वाचल्या गेलेल्या 'टॉप 3' बातम्या
1. पुण्यात आढळला लांडगा आणि कुत्र्याचा संकरित प्राणी, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे का?
कुत्रा आणि लांडगा यांच्यातील संकराच्या अशा घटनांवर जगभरात संशोधन होत आलं आहे. पण भारतात असा ठोस पुरावा मिळवण्यासाठी पहिल्यांदाच एक वैज्ञानिक अभ्यास केला गेला.
पुण्याच्या द ग्रासलँड्स ट्रस्ट या संस्थेसोबत अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्वहार्यन्मेंट (ATREE) आणि नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस (NCBS) या तीन संस्थांनी एकत्र येऊन कुत्रा आणि लांडग्याच्या संकरातून तयार झालेल्या 'वूल्फ-डॉग' या प्राण्यावर एक संशोधन केलं.
यानिमित्ताने लांडगा आणि कुत्र्यांमध्ये हा संकर का घडून येतो आहे? भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या त्यासाठी कारणीभूत आहे का आणि यावर आणखी संशोधन करणं का गरजेचं आहे, या प्रश्नांची उत्तरं या बातमीच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.
ही बातमी तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता.

फोटो स्रोत, THE GRASSLANDS TRUST
2. खटावमधल्या पिढ्यानपिढ्या दुष्काळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर मात करण्याच्या चिकाटीची गोष्ट
साताऱ्यातल्या एकूण 11 तालुक्यांपैकी मान, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्यांना नियमितपणे दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यातही मान आणि खटाव हे दोन्ही तालुके कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त तालुके म्हणून ओळखले जातात.
रामचंद्र खाडे हे सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील एनकुळ गावचे शेतकरी. गावातील नढवळे वस्तीवर आमची त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी दुष्काळाशी दोन हात करत शेतीत केलेल्या प्रयोगासंदर्भात बीबीसी मराठीने वार्तांकन केलं होतं.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
3. भरदिवसा तब्बल 4 मिनिटं होणार अंधार, नासा प्रयोगांसाठी सज्ज
पृथ्वी हा सूर्यमालेतला एकमेव ग्रह आहे जिथून खग्रास सूर्यग्रहण पाहता येतं. दर 18 महिन्यांनी पृथ्वीवरच्या कोणत्यातरी भागात सूर्यग्रहण दिसत असतं.
2024 मध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ऐतिहासिक विषयांवरच्या 'टॉप 3' बातम्या
1. बडोद्याच्या महाराजांशी लग्न करण्यासाठी सीता देवींनी इस्लाम धर्म स्वीकारला होता तेव्हा
बडोद्याच्या महाराज प्रतापसिंह राव गायकवाड यांच्या दुसऱ्या पत्नी महाराणी सीता देवी यांचा जन्म 12 मे 1917 रोजी तत्कालीन मद्रास (सध्याचे चेन्नई) प्रांतात झाला. बडोद्याच्या या महाराणींची प्रेमकहाणी तर चर्चेत होतीच पण त्यावेळी त्यांच्या लग्नाबाबतही वाद निर्माण झाला होता. सीता देवी बडोद्याच्या महाराज प्रतापसिंह राव गायकवाड यांच्या प्रेमात पडल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
2. दुर्गाबाई भागवत: जिज्ञासेपोटी प्राणाचंही मोल द्यायला तयार असलेली लेखिका
दुर्गाबाई भागवत म्हटलं की सर्वांत पहिले आठवतं ते त्यांनी आणीबाणीला केलेला प्रखर विरोध. त्या विरोधामुळे त्यांना तुरुंगवास देखील सोसावा लागला.
एका बाजूला त्यांची लेखणी व्यवस्थेला हलवू शकण्याची ताकद असलेली होती त्याच वेळी सामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेणारं देखील त्यांचं लिखाण होतं.

फोटो स्रोत, Getty Images
3. अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांना जेव्हा कुमार सप्तर्षींनी आव्हान दिलं होतं
1973 साली पुरीचे शंकराचार्यानी दिलेलं एक कुमार सप्तर्षींनी स्वीकारलं आणि दोन दिवस त्यांच्याशी वाद घातला. धार्मिक प्रश्नांना तार्किक मुद्द्यांवर घातलेला हा वाद महाराष्ट्रासह देशभर गाजला.
2024 मध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या राजकीय विषयावरच्या 'टॉप 3' बातम्या
1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पात्रतेच्या अटी बदलल्या, अर्जाची तारीखही वाढवली, जाणून घ्या नवे बदल
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
2. महाराष्ट्राचा निकाल काय असेल? जाणून घ्या 'या' 5 राजकीय विश्लेषकांचं मत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी राज्यातील ज्येष्ठ राजकीय निरीक्षक, संपादक आणि पत्रकारांनी वर्तवलेलं निकालाचं भाकीत वाचण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता.
या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालणार? कोणत्या जातीय समीकरणांचं गणित मांडलं जाणार? मराठवाड्यात काय होणार? विदर्भात कुणाची सरशी होणार? मुंबईच्या लढाईत कोण जिंकणार? अशा वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात या बातमीच्या निमित्ताने चर्चा करण्यात आली होती.

3. महाराष्ट्रातल्या निवडणुकीतले हे 7 धक्कादायक निकाल
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला 50 च्या आसपास जागा मिळाल्या. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे मोठे नेते पराभूत झालेत. तर बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करवा लागला आहे.
2024 मध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या सामाजिक-राजकीय विषयावरील 'टॉप 3' बातम्या
1. 'पावसात भिजू नये म्हणून बाप्पाला मशिदीत नेले, तीच परंपरा बनली', गोष्ट गणेशोत्सवातील बंधूभावाची
गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगलीतल्या काही गावांमध्ये हिंदू-मुस्लीम सलोख्याची एक अनोखी परंपरा पाहायला मिळतेय. मुस्लीम धर्मियांचं प्रार्थनास्थळ असलेल्या काही मशिदींमध्ये गेली चाळीसहून अधिक वर्षं गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यात गोटखिंडी गावातल्या मशिदीत बसवल्या जाणाऱ्या या गणपतीची गोष्ट सुरू होते 1961 पासून. या गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन गणपती बसवला.

फोटो स्रोत, SARFARAJ SANADI/YOGESH JIWAJE
2. 'वडील वारल्यानंतर भाऊ हक्कसोड मागायला आला, पण मी वारसा हक्क मिळवून दाखवला'
2024 मध्ये बीबीसी मराठीने 'कणखर बायांची गोष्ट' या विशेष मालिकेमधून राज्यभर वेगवेगळ्या विषयांवर काम करणाऱ्या धाडसी महिलांच्या गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवल्या.
याच मालिकेतील एक गोष्ट मराठवाड्यातल्या बीडमध्ये राहणाऱ्या रुक्मिणी यांची होती. त्यांनी संघर्ष करून माहेरच्या संपत्तीतला त्यांच्या हक्काचा वाटा मिळवला. त्यांनी दाखवलेला मार्ग राज्य आणि देशातील अनेक महिलांना मार्गदर्शक ठरतो आहे.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
3. 'तू काहीही कर, कितीही शिक; मात्र आंतरजातीय प्रेमविवाह करू नकोस'- ब्लॉग
यावर्षी ऑगस्ट महिन्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये ( आधीचं औरंगाबाद) मुलीनं केलेलं लग्न पसंत नव्हतं. म्हणून मुलीच्या वडील आणि भावानं तिच्या नवर्याची हत्या केली. या घटनेमुळे समाजातील जातीयवाद आणि त्यावरून हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.
2024 मध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या महिलांविषयक 'टॉप 3' बातम्या
1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती दूत अॅपहून अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
राज्याच्या निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठीच्या प्रक्रियेची माहिती देणारी बातमी बीबीसी मराठीने केली होती.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 'नारीशक्ती दूत' या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याविषयीची सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटो स्रोत, Getty Images
2. बाळाला सांभाळण्यासाठी वडिलांनी थेट नोकरी सोडली, संगमनेरच्या बापमाणसाची प्रेरणादायी गोष्ट
स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा ट्रेंडिंग असण्याच्या हा काळ आहे. आजकाल या विषयावर अनेक भाषणं केली जातात, वर्तमानपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये मोठमोठे लेख लिहिले जातात पण या गप्पा कृतीत उतरवताना मात्र अनेकांची अडचण होते.
पुण्यात राहणाऱ्या प्रवीण सिंधू भीमा शिंदे आणि प्रियांका सोनवणे या दांपत्याने मात्र स्त्री-पुरुष समानतेचं हे तत्व स्वतः जगण्याचा निर्णय घेतलाय.

फोटो स्रोत, Getty Images
3. फायब्रॉईड म्हणजे काय? गर्भाशयात गाठी का होतात? त्यांची लक्षणं काय?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, फायब्रॉईड म्हणजे कॅन्सरची गाठ अजिबात नाही. फायब्रॉईड्स स्नायूपेशी (Muscle Cells) आणि तंतुपेशी (Fibroid Cells) यांच्यापासून बनलेले असतात.
फायब्रॉईड्स कशामुळे होतात याचं निश्चित कारण सांगता येत नाही. तज्ज्ञ म्हणतात, तिशीच्या आसपास असलेल्या स्त्रियांपैकी 20 टक्के महिलांच्या गर्भाशयात गाठी होण्याची शक्यता असते.
2024 मध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय विषयांवरच्या 'टॉप 3' बातम्या
1. 3 खोल्याचं घर आणि दीड कोटी रुपये पगार दिला तर या बेटावर शिक्षकाची नोकरी कराल का?
तुम्हाला महिना 15 हजार पौंड (15 लाख रुपये) दिले तर स्कॉटलंडमधील सगळ्यांत सुंदर जागी नोकरी करायला तयार व्हाल का? (वर्षाला एक कोटी 80 लाख पगार)
युइस्ट आणि बेनबेक्युला येथील हेब्रिडिअन बेटांवर काम करण्यासाठी आकर्षक पगारांची ऑफर देण्यात येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2. असा देश ज्याला 'नवीन दुबई' म्हटलं जातंय, 'जणू संपूर्ण देशाला लॉटरीच लागलीय'
एकेकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेला गयाना 2019 पासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातोय. दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील सुरीनाम आणि व्हेनेझुएला या दोन देशांमध्ये गयाना वसलेला आहे.
आजघडीला आठ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला हा देश सुरूवातीच्या काळात ऊस उत्पादनासाठी डच वसाहत म्हणून उदयास आला.

फोटो स्रोत, Getty Images
3. हर्षिता ब्रेला कोण आहे, जिचा मृतदेह लंडनमध्ये गाडीच्या डिकीत सापडला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
महिलांवरील अत्याचाराची नवनवीन प्रकरणं सातत्यानं समोर येत असतात. त्यातही पती-पत्नीतील वाद किंवा सासरच्या मंडळींकडून महिलेचा होणारा छळ आणि त्यातून घडणारे गुन्हे अनेकदा समोर येत असतात.
परदेशात जाऊन सुखी संसार करण्याचं आणि एक छान, सुंदर आयुष्य जगण्याचं स्वप्नं अनेक मुलींचं असतं. हर्षिता ब्रेला ही अशीच भविष्याची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती.
मात्र हर्षिताच्या वाट्याला वेगळंच आयुष्य आलं. इतकंच नाही तर तिला जीवाला देखील मुकावं लागलं.
हर्षिता ब्रेलाच्या विवाहानंतरच्या छळाची आणि मृत्यूची हेलावून टाकणारी कहाणी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











