कॉमनवेल्थ गेम्स : बीडच्या अविनाश साबळेनं रचला इतिहास, स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदकाची कमाई

अविनाश साबळे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अविनाश साबळे

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने बर्मिंगहॅम कॅामनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आणि नवा इतिहास रचला.

अविनाशने 8 मिनिटे 11.20 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.

ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ असून हा नवा राष्ट्रीय विक्रमही आहे.

कॅामनवेल्थ गेम्समध्ये स्टीपलचेस शर्यतीत भारताचं हे पहिलंच पदक आहे.

याआधी भारताच्या ललिता बाबरनं 2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसचं कांस्यपदक मिळवलं होतं आणि तिनं 2016 साली ॲालिंपिकची फायनलही गाठली होती.

अविनाशनं या पदकासोबतच पुरुषांच्या स्टीपलचेसमध्ये केनियाच्या वर्चस्वालाही तडा दिला आहे.

1994 पासून कॅामनवेल्थ गेम्समध्ये या स्पर्धेतली तीनही पदकं केनियन धावपटूंनी जिंकली होती.

यावेळीही केनियाचे तेच यश मिळवणार अशी चिन्हं होती कारण अविनाश अखेरच्या लॅपपर्यॅत चौथ्या क्रमांकावर होता. पण त्यानं मुसंडी मारली आणि दुसरं स्थान मिळवलं.

अविनाशच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं अभिनंदन करत, अविनाशसोबतचा आधीचा संवादाचा व्हीडिओ सुद्धा ट्वीट केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तसंच, कॉमनवेल्थमधील विजयानंतर अविनाशनं एएनआयशी संवाद साधला. त्यावेळी त्यानं पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादाचा उल्लेख केला. हा व्हीडिओ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलल्यानंतर प्रेरणा मिळाली होती. मलाही वाटलं की, आपण पदक जिंकलं पाहिजे. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभागी झालो होतो. पण तिथं पदक जिंकता आलं नव्हतं.

बीडच्या बांधावरून बर्मिंगहॅमपर्यंत... अविनाशचा प्रेरणादायी प्रवास

अविनाश बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावचा आहे. एका शेतकरी कुटुंबात 13 सप्टेंबर 1994 रोजी त्याचा जन्म झाला.

वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश घरापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या शाळेत चालत किंवा पळत जात असे. बारावीचं शिक्षण झाल्यावर त्यानं लष्करात प्रवेश केला.

अविनाश साबळे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अविनाश साबळे (संग्रहित फोटो)

अविनाश 5 महार रेजिमेंटचा जवान म्हणून 2013-14 साली सियाचेन या अतिथंड युद्धभूमीवर तैनात होता. मग राजस्थान आणि सिक्कीममध्येही त्यानं ड्यूटी बजावली.

2015 साली तो लष्कराच्या क्रॅास कंट्री शर्यतीत सहभागी झाला आणि त्याच्या ॲथलेटिक्समधल्या कारकीर्दीला सुरूवात झाली.

अविनाशनं पुढे स्टीपलचेसची निवड केली आणि या स्पर्धेत वेगवेगळे राष्ट्रीय विक्रमही रचले.

टोकियो ॲालिंपिकमध्येही तो सहभागी झाला होता.

ताजी पदकतालिका तुम्हाला इथे पहायला मिळेल.

Commonwealth Medals table_Marathi

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)