कॉमनवेल्थ गेम्स 2022 : अचंता शरत कमलने 40 व्या वर्षी जिंकलं 'सुवर्ण'

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या अंचता शरत कमलने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. टेबल टेनिसच्या पुरुष सिंगल्समध्ये वयाच्या 40 व्या वर्षी अचंता शरत कमलने 'सुवर्ण' कामगिरी केलीय.
अचंताने फायनलमध्ये इंग्लंडच्या लियम पिचफोर्डला 4-1 ने पराभूत केलं.
कालच अंचातनं श्रीजा अकुलासोबत मिश्र सामन्यात सुवर्ण पदक जिंकलं होतं. अचंता आणि श्रीजाच्या जोडीने मलेशियाच्या जावेन चुंग आणि कारेन लाइनेला 3-1 ने पराभूत केलं होतं.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव
बर्मिंगहॅमधील कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियानं भारताचा 9 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकलं आहे.
या पराभवामुळे भारतीय महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 162 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
प्रत्युत्तरात भारतीय संघ तीन चेंडू शिल्लक असताना सर्व विकेट्स गमावून केवळ 152 धावा करू शकला.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने धडाकेबाज फलंदाजी केली. तिने अवघ्या 34 चेंडूत 50 धावा केल्या.
याआधी रविवारी (7 ऑगस्ट) न्यूझीलंडनं इंग्लंडच्या महिला संघाचा आठ गडी राखून पराभव करत कांस्यपदक जिंकलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेट
राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच राष्ट्रकुल स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन झालं आहे.
याआधी 1998 च्या क्वालालंपूर कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष क्रिकेट सामने खेळवले गेले होते. तेव्हा 50 षटकांच्या सामन्यात 16 संघांनी भाग घेतला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सुवर्णपदक. ऑस्ट्रेलियाने रौप्य आणि न्यूझीलंड संघाने कांस्यपदक जिंकलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
याआधी भारतीय बॉक्सिंगपटू निखत जरीनला कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे. उत्तर आयर्लंडच्या कार्ली मॅकनॉलला हरवून तिने हे सुवर्ण मिळवले आहे.
पुरुषांच्या ट्रिपल जंपमध्ये भारताला 'सुवर्ण' आणि 'रौप्य'
कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या ट्रिपल जंपमध्ये भारतीय स्पर्धकांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
पहिलं अॅडोल्स पॉलने 17.03 मीटरची उडी घेत सुवर्ण पदक मिळवलं.
त्यानंतर अब्दुल्ला अबुबकरने 17.02 मीटरची उडी घेत रौप्य पदकावर नाव कोरलं.

फोटो स्रोत, Reuters
भारताला आणखी एक पदक मिळू शकलं असतं. मात्र, प्रवीण चित्रावेल तिसऱ्या स्थानी राहिला.
बॉक्सर नीतू घनघस आणि अमित पंघालचे 'गोल्डन' पंच
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची महिला बॉक्सर नीतू घनघसनं मिनिमट वेट कॅटेगरीत सुवर्ण पदक मिळवलं, तर भारताचा बॉक्सर अमित पंघालनं 48-51 किलोग्राम गटात सुवर्ण पदक मिळवलंय.

फोटो स्रोत, Eddie Keogh/Getty Images
नीतू घनघसनं शनिवारी कॅनडाच्या प्रियंका ढिल्लोला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. फायनलमध्ये इग्लंडच्या डेमी जेडला 48 किलो वजनी गटात 5-0 ने पराभूत करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.
दुसरीकडे, अमित पंघालनं इग्लंडच्या किएरन मॅकडोनाल्डला 5-0 नं पराभूत करून सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे.

फोटो स्रोत, PA Media
भारताच्या महिला हॉकी संघाला 'कांस्य', न्यूझलंडला केलं पराभूत
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या महिला हॉकी संघानं न्यूझीलंडच्या संघाचा पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.
भारताकडून दुसऱ्या क्वार्टरमध्ये सलीमा टेटेने गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडनं बरोबरी करणारा गोल केला. मात्र, भारतानं रेफरलचा निर्णय घेतला आणि तो गोल रद्द झाला.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, नंतर न्यूझीलंडनं बरोबरी केली. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं विजयाला गवसणी घातली.
भारताला सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
विनेश फोगाट आणि रवी दहियाने पटकावलं सुवर्णपदक
ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताने शनिवारी चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सात कांस्य पदके जिंकली.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (राष्ट्रकुल स्पर्धेत) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी फोगट ही भारतातील पहिली महिला कुस्तीपटू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय, सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील हे तिचे तिसरे सुवर्णपदक आहे.
विनेश फोगटच्या सुवर्णपदकासह भारताच्या खात्यात एकूण 11 सुवर्णपदके जमा झाली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
विनेशच्या काही वेळाआधीच पुरुष कुस्तीपटू रवी दहियाने नायजेरियन कुस्तीपटूचा पराभव करून कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले.
रवी दहियाने तीन वेळा आशियाई चॅम्पियनशिप जिंकली आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो पहिल्यांदाच खेळत होता.
तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्धी कुस्तीपटुला 10-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
जास्मिन लंबोरियाला बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक
भारताच्या जास्मिन लंबोरियानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला बॉक्सिंग स्पर्धेतील 60 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.

फोटो स्रोत, Francois Nel/Getty Images
शनिवारी झालेल्या या सामन्यात तिला इंग्लंडची बॉक्सर गेमा पेज हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. जेम्मा पेजने 3-2 असा विजय मिळवला.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची महिला क्रिकेट टीम फायनलमध्ये, पदक निश्चित
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या महिला क्रिकेट टीमनं इंग्लंडचा पराभव करत, फायनलमध्ये आपंल स्थान निश्चित केलं आहे. या विजयासह महिला क्रिकेटमधलं भारताचं पदकही निश्चित झालंय.
आज (6 ऑगस्ट) सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघानं इंग्लंडच्या संघाला 4 धावांनी पराभूत केलं.

फोटो स्रोत, ANI
फायनलमध्ये पोहोचल्यानं भारतीय महिला क्रिकेट संघाचं रौप्य पदक निश्चित झालं आहे.
आता फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाच्या महिला ब्रिगेडशी होणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
20 ओव्हरच्या या सामन्यात भारतानं पहिली फलंदाजी करत 5 विकेट्स देऊन 164 धावा केल्या होत्या. सलामीला मैदानात उतरलेल्या स्मृती मंधानाने 32 चेंडूत 61 धावा केल्या. तिने 8 चौकार आणि 3 षटकार लगावले.
जेमिमा रॉड्रिग्सनेही 31 चेंडूत 44 धावांची खेळी केली.
इंग्लंडकडून गोलंदाज फ्रेया केंपनं चांगली कामगिरी केली. भारताच्या दोन विकेट्स तिने एकटीने घेतल्या.
भारताच्या प्रियंका गोस्वामीने रेस वॉकिंगमध्ये जिंकलं रौप्य पदक
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या प्रियंका गोस्वामीने महिलांच्या 10 किलोमीटरच्या रेस वॉकिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केलीय.
यासह अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 पदकं जिंकली आहेत.

फोटो स्रोत, Twitter/@Priyanka_Goswam
प्रियंकानं 2020 च्या ऑलिम्पिकमध्येही याच स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
दीपक पुनिया, बजरंग पुनिया, साक्षी मलिकने कोरलं सुवर्णपदकांवर नाव
भारताच्या दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव करून कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थच्या कुस्ती सामन्यातील भारताचं हे तिसरं सुवर्णपदक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यापूर्वी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. आता या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे नववं सुवर्णपदक आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
दीपक पुनियाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. दीपक पुनियाच्या चमकदार कामगिरीचा अभिमान वाटतो, असं ट्विट मोदींनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
पंतपध्रान मोदींनी म्हणतात, "दीपक भारताचा अभिमान आहे. त्याने भारताला अनेक सन्मान दिले आहेत. त्याने सुवर्णपदक जिंकल्याने प्रत्येक भारतीयाला आनंद झाला आहे."
साक्षी मलिकचं भारतासाठी आणखी एक सुवर्ण
भारताच्या साक्षी मलिकनं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं आहे.
एका क्षणी साक्षी मलिक 62 किलो गटाच्या अंतिम फेरीत 0-4 अशी पिछाडीवर होती.
पण नेत्रदीपक पुनरागमन करताना तिने तिची प्रतिस्पर्धी कॅनडाच्या अॅना गोडिनेझला चकित केलं.

फोटो स्रोत, Getty Images
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमधील कुस्तीतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक होतं. यापूर्वी बजरंग पुनियाने सुवर्णपदक जिंकलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साक्षी मलिकचे अभिनंदन केलं आहे.
त्यांनी ट्विट करून लिहिलं की, "बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळाडू सतत अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. मी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल साक्षी मलिकचे अभिनंदन करतो. ती प्रतिभेचे शक्तिस्थान आहे."
बजरंग पुनियाने पटाकवले सुवर्णपदक
बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 65 किलो वजनी गटात कुस्तीत सुवर्णपदक पटकावले आहे. हे कुस्ती प्रकारातील भारताचं पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अंतिम सामन्यात कॅनडाचा खेळाडू लेचलान मॅकनीलचा पराभव करून त्यानं या पदकावर नाव कोरलं आहे.
अंशू मलिकला रौप्य पदक
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अंशू मलिकला 57 किलो गटातील कुस्तीमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

फोटो स्रोत, Getty Images
तिला अंतिम सामन्यात नायजेरियाच्या फोलसाडे अडेकुरोयेकडून पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये यावर्षी 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे.
मागच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत तिसऱ्या स्थानी राहिला होता.
ताजी पदकतालिका तुम्हाला इथे पहायला मिळेल.
Commonwealth Medals table_Marathi
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)