'16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं'-बीबीसी मराठी राऊंडअप

बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेल्या काही बातम्यांचा राऊंड-अप असा.

1. '16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं'

"2014 साली राज्यात स्थिर सरकार यावं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मदत केली होती. एका निवडणुकीनंतर तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा नव्या निवडणुकीला सामोरं जावं लागू नये, यासाठी राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला. त्यामागे केवळ राज्याचं हित, हाच हेतू होता," असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.

"पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेच राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम केलं आहे. या 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मदत करण्याची कधीही भूमिका मी घेतलेली नाही," असं ते म्हणाले. धनंजय मुंडे बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण मुलाखत या ठिकाणी पाहू शकता.

2. चक्रीवादळाने आफ्रिकेत हाहाकार : 180 जण ठार, अनेक बेपत्ता

मोझंबिक इथं चक्रीवादळाने हाहाकार उडवला असून या आपत्तीत मृतांची संख्या हजारावर आहे. या चक्रीवादळाचं नाव ईदाई असं आहे.

मोझंबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलप न्युसी यांनी मृतांची संख्या 1000 असेल अशी भीती व्यक्त केली आहे.

ताशी 177 किलोमीटर इतका वाऱ्याचा वेग असलेले हे चक्रीवादळ बैरा इथं गुरुवारी धडकले. पण आपत्ती निवारण यंत्रणा इथं पोहोचण्यासाठी रविवार उजाडला. संपूर्ण बातमी या ठिकाणी वाचा.

3. प्रमोद सावंत : संघाच्या मुशीतील डॉक्टर ठरले पर्रिकरांचे वारसदार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा प्रमोद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच विजय सरदेसाई आणि सुदिन ढवळीकर अशा दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यामुळे प्रथमच गोव्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.

सरकारी डॉक्टरपासून करिअर सुरू केलेले प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. तरुण वयात मुख्यमंत्री बनलेल्या प्रमोद सावंत यांच्यासमोर आव्हानंही तितकीच मोठी आहेत. घटक पक्षांना सांभाळून घेण्याची कसरत करत त्यांना गोव्यातील अनेक समस्यांवर 'उपचार' करावा लागणार आहे. प्रमोद सावंत यांचा संपूर्ण प्रवास या ठिकाणी वाचा.

4. '2014 मध्ये सरकार भाजपचं आलं होतं, पण 2019मध्ये सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असेल'

2014 मध्ये सरकार भाजपचं आलं होतं, पण 2019मध्ये सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असेल, असं शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलून दाखवली.

बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. संपूर्ण मुलाखत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

5. JNUचे नजीब अहमद खरंच ISमध्ये गेलेत का? - फॅक्ट चेक

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कथित इस्लामिका स्टेटच्या ( IS किंवा आयसिस) झेंड्याच्या पार्श्वभूमीवर काही शस्त्रास्त्रधारी उभे आहेत.

हा फोटो जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नजीब अहमदचा आहे असा दावा काही उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवरून करण्यात येत आहे. बीबीसी फॅक्ट चेकच्या टीमने यामागचं सत्य काय आहे याची पडताळणी केली आहे. संपूर्ण बातमी या ठिकाणी वाचा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)