You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चक्रीवादळाने आफ्रिकेत हाहाकार : 180 जण ठार, अनेक बेपत्ता
मोझंबिक इथं चक्रीवादळाने हाहाकार उडवला असून या आपत्तीत मृतांची संख्या हजारावर आहे. या चक्रीवादळाचं नाव ईदाई असं आहे.
मोझंबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलप न्युसी यांनी मृतांची संख्या 1000 असेल अशी भीती व्यक्त केली आहे.
ताशी 177 किलोमीटर इतका वाऱ्याचा वेग असलेले हे चक्रीवादळ बैरा इथं गुरुवारी धडकले. पण आपत्ती निवारण यंत्रणा इथं पोहोचण्यासाठी रविवार उजाडला.
बचाव पथकात काम करणाऱ्या युनायटेड नेशनचे कर्मचारी जेराल्ड बोरुक यांनी बीबीसीला सांगितलं की आपत्तीग्रस्त परिसरात जवळपास सर्व घरं मोडकळीला आली आहेत. ते म्हणाले, "या आपत्तीत एकही इमारत वाचलेली नाही. वीज, दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे. रस्त्यांवर सर्वत्र विजेचे खांब पडलेले आहेत. अनेकांनी आपलं घरं गमावली आहेत."
अधिकृत माहितीनुसार मृतांची संख्या 84 आहे, तर या वादळात पूर्ण आफ्रिकेत 180 लोकांचा बळी गेला आहे.
International Federation of Red Cross and Red Crescent Societyने झालेलं नुकसान आतोनात असल्याचं म्हटलं आहे. International Federation of Red Cross and Red Crescent Societyच्या इथल्या टीमचे प्रमुख जॅमी लेसेउर म्हणाले, "जीव वाचवण्यासाठी बरेच लोक झाडांवर चढून बसले आहेत. त्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे."
झिंबाब्वेमध्ये मृतांची संख्या 98 इतकी आहे, तर दक्षिण आणि उत्तर भागात 217 लोक बेपत्ता आहेत. मालावी इथंही मृतांची संख्या मोठी आहे, इथं जवळपास 122 लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. झिंबाब्वेमध्ये राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे.
मोझंबिक आणि मालावी या दोन्ही देशांना मदत करण्याची घोषणा ब्रिटनने केली आहे.
बैरा या शहरात सर्वाधिक नुकसान झालं आहे. या शहराची लोकसंख्या 5 लाख आहे. हे शहर इथल्या सोफाला या प्रांतात येतं. या प्रांताचे राज्यपाल अल्बर्टो मोडंलेन म्हणाले प्रत्येक जण या आपत्तीचा सामना करत आहे. सध्या मदत पोहोचवणं हीच आमची प्राथमिकता आहे.
पूर्वी झिंबाब्वेतील बीबीसीच्या प्रतिनिधी शिंगाई नोयका यांनी अशा प्रकारची आपत्ती पूर्वी कधीही पाहिली नव्हती, असं म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)