बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख...

फोटो स्रोत, Getty Images
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले 5 खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील 5 खास बातम्या आम्ही देत आहोत.
कोव्हिड, आरोग्य, मनोरंजन, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक असे 5 लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. कोव्हिड : ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधं खरेदी करून घरी ठेवावीत का?
चीनमध्ये पुन्हा एकदा कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भारतातही भीती वाढली आहे.
यावेळी आपण कोव्हिडची किती भीती बाळगली पाहिजे का? किती काळजी घ्यावी? आपल्याला लस, मास्क, गोळ्या, ऑक्सिजन, प्रवास याबद्दल अनेक शंका सतावत असतात.
बीबीसीने याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली आहे. त्याची माहिती या बातमीत घेऊ.
सध्या पसरत असलेला Omicron व्हेरिअंट आहे. त्याचे चीनमध्ये सध्या BA2.75, BQ1, XBB आणि BF7 प्रकार आहेत.
सध्या पसरत असलेल्या या व्हेरिएंटची वैशिष्ट्ये काय आहेत? भारतासाठी तो किती धोकादायक आहे? जाणून घेऊया या बातमीत.

फोटो स्रोत, Getty Images
2.टेस्टीज कॅन्सर नेमका काय असतो? त्याची लक्षणं आणि उपचार काय?
भारतामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो तर क्रिकेटपटू देव. आपल्याही नकळतपणे आपण त्यांना रोल मॉडेल बनवून त्यांचे अनुकरण करीत असतो. असाच एक अनेकांचा आवडता क्रिकेटपटू ज्याने 2007 मध्ये T20, 2011 मधील वर्ल्डकप जिंकून देण्यास मदत केली. तो म्हणजे युवराज सिंग.
तुम्हाला वाटेल त्याचा इथे काय संबंध? युवराजसिंगला वृषणाचा (Testis) कॅन्सर झालेला होता आणि उपचारांती तो पूर्णपणे बरा झाला आहे.
आणि नुसता बराच झाला नाही तर त्याने मेहनत करून पुन्हा भारतीय टीममध्ये जागा मिळवली. इतकेच काय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान विरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करून एकहाती सामना जिंकून दिला. यावेळी आपली खेळी त्याने कॅन्सरशी झगडत जगणाऱ्या लोकांना अर्पण केली.
पुरुषांमध्ये आढळणारा हा वृषणाचा कॅन्सर नेमका काय असतो? या बातमीत समजून घेऊया.

फोटो स्रोत, RRR/FILMGRAB
3.या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटांनी हिंदू-मुस्लिम दरी वाढवली की कमी केली?
एक कथा, अनेक व्यक्तिरेखा, अनेकांची मेहनत. या सगळ्यातून एक चित्रपट साकार होतो. अनेकदा चित्रपटांना समाजाचा आरसा म्हटले जाते.
पण हा आरसा अलीकडील काळात धूसर झाला आहे की स्वच्छ झाला आहे?
दोन धर्मातील एकी दिसताना, त्यांच्यातील तेढ कमी होताना किंवा ती अजूनच खोलवर जाताना दाखविण्यात आलेले चित्रपट आठवत आहेत का?
या गोष्टीमध्ये आपण 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अशा काही चित्रपटांबद्दल बोलणार आहोत, ज्यातील एखादे दृश्य किंवा संपूर्णच चित्रपटाच्या पार्श्वभूमीलाच धार्मिक रंग होता. वाचा ही बातमी-

फोटो स्रोत, rahul ransubhe
4.मोईन काबरा: 'जसं पुस्तकांमुळे बाबासाहेबांचं आयुष्य बदललं तसं माझंही बदलेल'
“ज्याप्रमाणे बाबासाहेबांचं पुस्तकांनी आयुष्य बदललं, तसं पुस्तकं आपलंसुद्धा आयुष्य बदलू शकतात असं मला आतून कुठं तरी वाटायला लागलं आणि तेव्हापासून मी पुस्तकांना आपला मित्र बनवून घेतलं. आज मी दररोज दिवसाचे 40 - 45 पेजेस वाचत असतो. एका आठवड्यामध्ये 2 पुस्तकं, 15 दिवसांमध्ये 4 तर एका महिन्यामध्ये 8 पुस्तकं वाचणं होतात.”
ही दिनचर्या आहे बुलडाण्याच्या सुल्तानपूरमध्ये राहणाऱ्या मोईन काबराची.
बुलडाण्यापासून 75 किमीवर असलेल्या सुल्तानपुर या गावातील मोईन काबरा हा तरूण लोकांमधील वाचनप्रेम वाढावं यासाठी प्रयत्न करतोय. यासाठी त्याने स्वखर्चाने स्वतःच्या घरी मोफत लायब्ररी सुरू केली आहे. जाणून घेऊया मोईनचा प्रवास.

फोटो स्रोत, Getty Images
5. गायरान जमीन म्हणजे काय, ही जमीन कोणत्या कामांसाठी वापरली जाऊ शकते?
गायरान जमीन हा ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. वेळोवेळी हा विषय चर्चेत येतो. आता अजित पवारांनी अब्दुल सत्तारांवर केलेल्या आरोपांमुळे हा विषय चर्चेत आला.
याआधी मुंबई उच्च न्यायालयानं गायरान जमिनीवरील अतिक्रमणं हटवण्याचा निर्णय दिला होता, तेव्हाही हा विषय चर्चेत आला होता.
पण मुळात गायरान जमीन म्हणजे काय, ती कोणत्या कामांसाठी वापरता येते, याची सविस्तर माहिती या आपण या बातमीत पाहणार आहोत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








