You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: इंग्लंडच्या विक्रमाचे साक्षीदार- रिचर्ड एलिंगवर्थ, तेव्हा प्लेयर आता अंपायर
इंग्लंडने तब्बल 27 वर्षांनंतर वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली. 1992मध्ये यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला नमवत सेमी फायनल गाठली होती. 1992 वर्ल्ड कप संघातील एक सदस्य यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही आहेत. पण वेगळ्या भूमिकेत.
22 मार्च 1992 रोजी सिडनी इथं इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाली होती. इंग्लंडने 252 धावांची मजल मारली. ग्रॅमी हिकने 83 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून अॅलन डोनाल्ड आणि माईक प्रिंगल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 232 धावांची मजल मारली. वादग्रस्त डकवर्थ लुईस प्रणालीमुळे आफ्रिकेला एका चेंडूत 22 धावांचं लक्ष्य मिळालं आणि इंग्लंडने सामना जिंकला. अँड्र्यू हडसनने 46 तर जॉन्टी ऱ्होड्सने 43 धावा केल्या. रिचर्ड एलिंगवर्थ आणि स्मॉलने यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
फायनलमध्ये इंग्लंडसमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना 249 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे इम्रान खान यांनी 72 तर जावेद मियांदाद यांनी 58 धावांची खेळी केली. इंझमाम उल हकने 42 तर वासिम अक्रमने 33 धावा केल्या. इंग्लंडकडून डेरेक प्रिंगल यांनी 3 विकेट्स घेतल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव 227 धावांतच आटोपला. नील फेअरब्रदरने सर्वाधिक 62 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुश्ताक अहमद आणि वासिम अक्रम यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. योगायोग म्हणजे इम्रान यांनी रिचर्ड एलिंगवर्थ यांनाच आऊट करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड कप जेतेपदावर मोहोर उमटवली होती.
इंग्लंडच्या त्या संघातील रिचर्ड इलिंगवर्थ यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अंपायर आहेत. इंग्लंडने जगाला क्रिकेट शिकवलं पण सर्वोच्च स्पर्धेचं जेतेपद त्यांच्यापासून दूरच राहिलं.
खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर इलिंगवर्थ यांनी अंपायरिंगचं प्रशिक्षण घेतलं.
एलिंगवर्थ यांनी 9 टेस्ट आणि 25 वनडेत इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एलिंगवर्थ यांच्या नावावर 376 मॅचेसचा अनुभव आहे. डावखुरे फिरकीपटू म्हणून त्यांनी योगदान दिलं.
2006 मध्ये त्यांचा ईसीबी अर्थात इंग्लंड क्रिकेट बोर्डातर्फे फर्स्ट क्लास क्रिकेटसाठीच्या अंपायर्सच्या यादीत समावेश झाला.
2009 मध्ये त्यांचा आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये समावेश झाला. चार वर्षांनंतर एलिंगवर्थ यांना बढती मिळाली आणि त्यांचा आयसीसी एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आलं.
एलिंगवर्थ चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अंपायर होते. त्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं होतं. यंदाच्या वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या अंपायर्स पॅनेलमध्ये एलिंगवर्थ यांचा समावेश आहे.
ज्या दोन देशांची मॅच असते, त्या देशाचे अंपायर त्या मॅचमध्ये अंपायरिंग करू शकत नाहीत असा आयसीसीचा नियम आहे.
इंग्लंडच्या संघाने सेमी फायनल गाठली असल्याने इलिंगवर्थ त्या सेमी फायनलमध्ये अंपायरिंग करू शकणार नाहीत परंतु दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ते अंपायरिंग करू शकतात. मात्र इंग्लंडने वर्ल्ड कपची फायनल गाठल्यास त्यांना अंपायरिंग करता येणार नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)