You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्हाला 'सुपरबोल' खेळाबद्दल काही माहिती आहे का?
बहुचर्चित सुपरबोलच्या सामन्यात द न्यू इंग्लंड पॅट्रियट्स संघाने लॉस एंजेलिस रॅम्सवर 13-3 असा दणदणीत विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली. या विजयासह लॉस एंजेलिस रॅम्सने सुपरबोलच्या सर्वाधिक जेतेपदाच्या पिट्सबर्ग स्टीलर्स संघाच्या सहा जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली.
पॅट्रियटचा क्वार्टरबॅक म्हणजेच कर्णधार टॉम ब्रॅडीने सहावी सुपरबोल रिंग पटकावण्याचा मान मिळवला. 66 वर्षीय बिल बेलिचिक सुपरबोलच्या इतिहासातले सगळ्यात यशस्वी प्रशिक्षक आहेत.
सुपरबोल हा अमेरिकन फुटबॉल विश्वातला अत्यंत लोकप्रिय असा चॅम्पियनशिप सामना आहे. टीव्हीवर पाहताना अमेरिकन फुटबॉल रग्बीसारखा धसमुसळा दिसतो. अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत प्रोटेक्शन गिअर्सची व्यवस्था असते.
अमेरिकन फुटबॉलमध्ये दोन कॉन्फरन्स म्हणजे दोन मोठ्या स्पर्धा असतात. अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स म्हणजे AFC आणि नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स अर्थात (NFC) अशा स्पर्धा असतात.
सुपर बोल ही दरवर्षी होणारी स्पर्धा आहे. AFC आणि NFC या स्पर्धांच्या विजेत्या संघांदरम्यान सुपर बोलचा सामना रंगतो. न्यू इंग्लंड पॅट्रियट्स AFCचे विजेते आहेत तर एलए रॅम्स NFCचे विजेते आहेत. या दोन मातब्बर संघांमध्ये अव्वल कोण याचा फैसला सुपरबोलद्वारे होतो.
जगभरात अमेरिकन फुटबॉलचे चाहते पसरले आहेत. सुपरबोलच्या निमित्ताने जगभरातले चाहते टीव्हीच्या माध्यमातून या दोन सर्वोत्तम संघांमधील सामन्याचा आनंद लुटतात. प्रत्यक्ष मैदानावरही हजारो चाहते या सामन्याचा अनुभव याचि देहा याचि डोळा घेण्यासाठी उपस्थित असतात.
15 जानेवारी 1967 रोजी सुपरबोलचा पहिला सामना झाला होता. सुपरबोलच्या सामन्याला बिग गेम असंही संबोधलं जातं. सुपरबोलचा सामना ज्या रविवारी असतो त्यादिवशी अमेरिकेत सार्वत्रिक सुट्टीसारखं वातावरण असतं. स्टेडियममध्ये एखाद्या गेट टुगेदरसारखं वातावरण असतं. मित्रमैत्रिणी, नातेवाईक एकत्र येऊन या सामन्याचा आनंद लुटतात. सुपरबोलची तिकीटं हातोहात खपतात. सुपरबोलचं आयोजन मिळवण्यासाठी स्टेडियम्समध्ये चढाओढ असते. डोम आकाराच्या स्टेडियममध्ये तसंच उबदार वातावरण असलेल्या ठिकाणी हा सामना होतो.
सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेल्या क्रीडाविश्वातील मॅचेसमध्ये सुपरबोलचा समावेश होतो. 2016 मध्ये सुपरबोल लढत 111.5 दशलक्ष लोकांनी पाहिली.
कसा खेळला जातो सुपरबोल?
एका संघाने 100 यार्ड्स कव्हर केले की त्यांना 6 पॉइंट्स मिळतात. त्यानंतर बॉल किक करता येतो. तो गोलपोस्टमधून पार झाला की अजून 1 पॉइंट मिळतो.
एकूण 7 पॉइंट मिळतात. त्यानंतर दुसरी टीम दुसऱ्या दिशेने 100 यार्ड्स कव्हर करायला मिळतात. हे कव्हर करताना एका संघाकडे असलेल्या बॉलवर दुसऱ्या संघाने पकड मिळवली तर मग त्या संघाकडे बॉल येतो आणि ते गोलपोस्टच्या दिशेने प्रस्थान करतात.
फक्त कर्णधारच बॉल पास करू शकतो. बाकी खेळाडूंना बॉल पास करण्याचा अनुमती नसते. एका खेळाडूकडे बॉल आला की तो घेऊन त्याने धावत सुटणं अपेक्षित असतं. दुसरा संघ अर्थातच त्याला अडवून खाली पाडू शकतात. प्रत्येक संघाला अशा तीन संधी मिळतात. त्यात 10 यार्ड्स कव्हर केले की संघाला पुढच्या 10 यार्ड्ससाठी आणखी तीन संधी मिळतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)