जनरल मोटर्सच्या CFO झालेल्या दिव्या सूर्यदेवरा यांच्याबद्दल 11 गोष्टी

ऑटोमोबाइल क्षेत्रातील जागतिक पसारा असणाऱ्या जनरल मोटर्सच्या सीएफओ अर्थात मुख्य आर्थिक अधिकारीपदी भारताच्या दिव्या सूर्यदेवरा यांची नियुक्ती झाली आहे.

मूळच्या चेन्नईच्या दिव्या यांचा आतापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतातच झालं आणि पुढे त्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये दाखल झाल्या.

चेन्नईतील मध्यमवर्गीय दिव्या कशा झाल्या जनरल मोटर्सच्या CFO?

  • 1 सप्टेंबर 2018 पासून दिव्या आपला कार्यभार स्वीकारतील. मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरी दिव्या यांच्या वरिष्ठ असतील.
  • तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या 39वर्षीय दिव्या 2005 पासून जनरल मोटर्समध्ये कार्यरत आहेत.
  • याआधी त्या जनरल मोटर्समध्येच व्हाइस प्रेसिडेंटपदी (कॉर्पोरेट आणि फायनान्स) कार्यरत होत्या.
  • 2013 ते 2017 या कालावधीत त्या मुख्य इन्व्हेस्टमेंट आणि अॅसेट मॅनेजर म्हणून काम करत होत्या.
  • दिव्या यांनी चेन्नईतील मद्रास विद्यापीठातून कॉमर्सचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी कायद्याचं पदव्युतर शिक्षण घेतलं. यानंतर हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी MBAचं शिक्षण घेतलं.
  • व्यवसायाने त्या चार्टर्ड फायनॅनशिअल अॅनॅलिस्ट आणि चार्टर्ड अकाऊंटट आहेत.
  • जनरल मोटर्सचे सीईओ चक स्टीव्हन्स 1 मार्च 2018 रोजी निवृत्त झाले. चक यांच्या जागी दिव्या यांची नियुक्ती झाली आहे.
  • CEO आणि CFO या दोन्ही मोठ्या पदांवर स्त्रिया असणाऱ्या जगभरातल्या अगदी मोजक्या जनरल मोटर्सचं नाव नोंदलं गेलं आहे.
  • एका मुलाखतीत दिव्या यांनी त्यांच्या चेन्नईतल्या मध्यमवर्गीय पार्श्वभूमीबद्दल सांगितलं होतं. लहानपणीच वडील गेल्यामुळे त्यांना त्यांच्या आईनं एकटीनंच वाढवलं. त्यामुळे त्या कष्टांचं चीज करणं माझ्या आणि माझ्या बहिणींच्या हातात होतं, असं दिव्या सांगतात.
  • पदव्युत्तर शिक्षणासाठी पहिल्यांदा त्या हार्वर्ड बिझनेस स्कूलला दाखल झाल्या तेव्हा, अमेरिकेतल्या वातावरणानं कल्चरल शॉक बसल्याचं दिव्या सांगतात.
  • फोर्ब्ज या व्यापारविषयक मासिकाने दिव्या यांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)