'दंगल' फेम झायरा वसीम म्हणते की, हिजाब ही चॉईस नसून जबाबदारी आहे #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'दंगल' फेम झायरा वसीम म्हणते की, हिजाब ही चॉईस नसून जबाबदारी आहे
हिजाब घालणे ही ईश्वराने दिलेली जबाबदारी आहे. धर्म आणि शिक्षणाच्या निवडीमध्ये त्याचा घोळ घालणे योग्य नाही, असं अभिनेत्री झायरा वसीमनं म्हटलं आहे.
दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.
हिजाब वादावर मत व्यक्त करताना झायरानं एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे.
त्यात तिनं म्हटलंय, "हिजाब हा पर्याय नसून इस्लाममध्ये ईश्वराने दिलेली जबाबदारी आहे. जेव्हा एखादी महिला हिजाब परिधान करते, तेव्हा ती देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करत असते. जिच्यावर तिचे प्रेम असते आणि तिने स्वतःला त्याच्यासाठी समर्पित केलेले असते."
तिने पुढे लिहिलयं, "मी देखील एक स्त्री आहे आणि मी आदराने हिजाब घालते. माझा या संपूर्ण व्यवस्थेला विरोध आहे, जिथे महिलांना धार्मिक परंपरा पाळण्यापासून रोखले जाते आणि त्यांचा छळ केला जातो. हिजाबला चॉईस आहे, असं समजणं चुकीचंच आहे. इस्लाममध्ये हिजाब हा पर्याय नसून एक जबाबदारी आहे."
2. तिसऱ्या आघाडीने काही फरक पडत नाही- रामदास आठवले
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 20 फेब्रुवारी रोजी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यानंतर भाजपविरोधात देशात तिसरी आघाडी उभारली जात असल्याचं दिसून येत आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मात्र यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

फोटो स्रोत, Shivsena
"तेलगंणाचे मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्रात येऊन आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले आणि त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली तरी एनडीएला काहीही फरक पडणार नाही, केंद्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएच सत्तेत येणार," अशी प्रतिक्रिया या भेटीवर रामदास आठवले यांनी दिली आहे.
टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
केसीआर यांचं प्रभावक्षेत्र फक्त तेलंगाना पुरतंच मर्यादित आहे. तिसऱ्या आघाडीसाठी त्यांनी राजकीय पुढाकार घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असंही ते म्हणाले.
3. देशात एक वेगळी परिस्थिती निर्माण केली पाहिजे - शरद पवार
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची 20 फेब्रुवारीला भेट घेतली.
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार या भेटीनंतर शरद पवार म्हणाले, "सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चेदरम्यान देशात निर्माण झालेल्या स्थितीत बदल घडवण्याबाबत चर्चा करण्यात आली. नेत्यांमध्ये नेहमीच राजकीय चर्चा होत असतात, मात्र आजची चर्चा वेगळी होती.
"बेरोजगारी, गरिबीसारख्या समस्या कशा सोडवायला हव्यात यावर आमची चर्चा झाली. त्यासाठी देशात एक वेगळी परिस्थिती निर्माण केली पाहिजे आणि त्या दिशेने काम केले पाहिजे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
काँग्रेसला वगळून मोदींविरोधातील लढाई अशक्य, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे."
4. नरेंद्र मोदी भर सभेत कार्यकर्त्याच्या पाया पडले
उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दरम्यान, एका प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भर सभेत एका भाजप कार्यकर्त्याच्या पायाला स्पर्श केला.
या घटनेचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी उन्नाव येथे आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी मोदींना भगवान श्रीरामाची मूर्ती भेट दिली. मूर्ती दिल्यानंतर अवधेश कटियार यांनी मोदींच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर मोदींनी अवधेश कटियार यांना यासाठी मनाई केली आणि शिष्टाचार म्हणून पंतप्रधानांनी स्वतः अवधेशच्या पायाला स्पर्श केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
रामाची मूर्ती भेट म्हणून देणाऱ्याने पायाला स्पर्श करू नये, असे पंतप्रधानांच्या कृत्यामागचे कारण आहे, असं सांगत अरुण यादव यांनी हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
5. गुजरात भाजपच्या फाशीच्या शिक्षेबाबतच्या ट्वीटमुळे वाद
अहमदाबादमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात 49 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर गुजरात प्रदेश भारतीय जनता पक्षाने ट्विटरवर प्रसारित केलेल्या व्यंगचित्रावरून वाद निर्माण झाला आहे.
या व्यंगचित्रात फाशीच्या दोरखंडाला लोंबकळत असलेल्या व्यक्तींच्या डोक्यावर विशिष्ट धर्मीय परिधान करतात तशा टोप्या दाखविल्या आहेत आणि त्या लगतच 'सत्यमेय जयते', 'दहशतवाद पसरविणाऱ्यांना क्षमा नाही', असे लिहिले आहे. गुजरात प्रदेश भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे व्यंगचित्र प्रसारित केले आहे.
गुजरात काँग्रेसने यावर टीका केली असून, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा भाजप राजकीय लाभ उठवीत असल्याचा आरोप केला आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे प्रदेश काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले.
लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









