महाराष्ट्र कोरोना : आंध्र प्रदेशनं पाठवले 300 व्हेंटिलेटर्स, नितीन गडकरींनी मानले आभार, #5मोठ्याबातम्या

जगन मोहन रेड्डी

फोटो स्रोत, Twitter /ysjagan

फोटो कॅप्शन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी

आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आढावा

1. महाराष्ट्राला आंध्र प्रदेश देणार 300 व्हेंटिलेटर्स

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली आहे. फ्री प्रेस जर्नलनं ही बातमी दिली आहे.

आंध्र प्रदेश सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, "कोरोनाचा फटका बसलेल्या राज्यांना मदत करायचा आंध्र प्रदेश प्रयत्न करत आहे. आंध्र प्रदेशनं महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स पाठवले आहेत आणि त्यामुळे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना फोन करत त्यांचे आभार मानले आहेत."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

नितीन गडकरी यांनीही ट्वीट करत म्हटलंय, "मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना फोन केला होता आणि त्यांना महाराष्ट्राला मदत करण्याची विनंती केली होती. यानंतर त्यांनी लगेच 300 व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला पाठवले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो."

'आंध्र प्रदेश मेड टेक झोन'मध्ये या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे.

2. महिला सुरक्षेचा अभ्यासक्रमात समावेश करा - युजीसीची

महिला सुरक्षा आणि लिंगसमानतेबाबत जागृतीचा अभ्यासक्रमात समावेश करावा अशी सूचना यूजीसीने देशभरातल्या विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना केली आहे.

संसदेच्या स्थायी समितीने अॅट्रॉसिटीज क्राईम अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन हा अहवाल सादर केल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने युजीसीला पत्र पाठवलं होतं.

महिला हक्क, समाजातील महिला सुरक्षा याबाबत तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करावा असं सुचवण्यात आलं होतं.

महिला सुरक्षा आणि लिंग समानता जागृतीचा अभ्यासक्रमात समावेश करावा अशी सूचना युजीसीने विद्यापीठं आणि महाविद्यालयांना एका पत्रकाद्वारे केली आहे. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.

महिला सुरक्षा

फोटो स्रोत, Getty Images

3. 'अयोध्याप्रकरणी सरन्यायाधीश बोबडेंना शाहरुख खानला मध्यस्थ नेमायचे होते'

अयोध्याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांना अभिनेता शाहरुख खानना मध्यस्थ नेमायचं होतं ही बाब त्यांच्या निरोप समारंभात समोर आलीय.

शरद बोबडे

फोटो स्रोत, ANI

ज्येष्ठ वकील विक्रम सिंह हे बोबडे यांच्या निरोप समारंभात बोलत असताना ही गोष्ट समोर आलीय.

अभिनेता शाहरुख खान यासाठी तयार होता, पण ही प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. पण मध्यस्थाच्या माध्यमातून यावर तोडगा निघू शकतो असं बोबडे यांना वाटत असल्याचं विक्रम सिंह निरोप समारंभादरम्यान म्हणाले.

महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.

4. भारत जर्मनीहून ऑक्सिजन प्लांट करणार एअरलिफ्ट

जर्मनीहून 23 ऑक्सिजन प्लांट हवाई मार्गे आणण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतलाय. ही फिरती ऑक्सिजन निर्मिती संयंत्र आहेत. आणि तासाला 2400 लिटर ऑक्सिजन तयार करण्याची या यंत्रांची क्षमता आहे.

एअरलिफ्ट

फोटो स्रोत, ANI

आठवड्याभराच्या काळात प्रक्रिया पूर्ण करून हे प्लांट भारतात आणता येण्याची शक्यता आहे.

कोव्हिड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सशस्त्र दलांच्या हॉस्पिटल्समध्ये हे प्लांट बसवण्यात येतील. सकाळने याविषयीची माहिती दिली आहे.

5. बुरगुंडाकार निरंजन भाकरेंचं निधन

प्रसिद्ध लोककलावंत भारूडकार निरंजन भाकरे यांचं कोव्हिड 19ने निधन झालं. ते 62 वर्षांचे होते.

निरंजन भाकरे

फोटो स्रोत, Twitter / DGIPR

भाकरे यांना भजन आणि भारुडांचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. भारुडाच्या कार्यक्रमाद्वारे निरंजन भाकरेंनी अवयवदानाचा प्रचार केला होता. सहजसोप्या भाषेतून ते अवयवदानाचं महत्त्व लोकांना सांगायचे.

पण कोव्हिड 19 मुळे त्यांचं अवयनदान करता आलं नाही.

निरंजन भाकरे यांनी देशाबाहेरही कार्यक्रम केले होते. आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली होती.

लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)