कोरोना : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' नाशिकमध्ये दाखल

फोटो स्रोत, BBC/ Pravin Thakre
नागपूर येथे शुक्रवारी रात्री 3 टँकर उतरवल्यानंतर आता ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिकमध्ये दाखल झाली आहे.
महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता असल्याने परराज्यातून पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्याला रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात झाली असून ऑक्सिजन आणण्यासाठी गेलेली रेल्वे महाराष्ट्रात परतली आहे.
विशाखापट्टणमधून आणलेले तीन ऑक्सिजन कंटेनर्स रोल ऑन रोल ऑफ (रोरो) ऑक्सिजन एक्सप्रेसमधून शुक्रवारी (23 एप्रिल) रात्री नागपूर येथे उतरवण्यात आले.
त्यानंतर आज सकाळी ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिकमध्ये दाखल झाली आहे.

फोटो स्रोत, Ani
रोरो ऑक्सिजन एक्सप्रेसची ही पहिली रेल्वे मुंबईतल्या कळंबोली स्टेशनवरून पाठवण्यात आली होती.
ही रेल्वे रिकामे कंटेनर्स घेऊन विशाखापट्टणमला गेली आणि तिथे या कंटनेर्समध्ये ऑक्सिजन भरण्यात आलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ही रेल्वे विशाखापट्टणमवरून गुरुवारी रात्री रवाना झाली होती. या रेल्वेवर 7 ऑक्सिजन टँकर ठेवण्यात आले होते. त्यापैकी 3 टँकर नागपूरमध्ये उतरवण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Pravin Mudholkar/BBC
ही रेल्वे निघताना रेल्वे अधिकाऱ्यांनी या उपक्रमाची माहिती दिली होती. त्यानुसार, सात डब्यांच्या या विशेष गाडीच्या प्रत्येक डब्यातून 16 मेट्रिक टन ऑक्सिजन आणण्यात येईल आणि या ट्रेनला रेल्वेमार्गांवर प्राधान्य दिलं जाईल. अशा प्रकारच्या इतर गाड्या सुरू करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे.
भारतातल्या ज्या 12 राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय, ती आहेत - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान.
एकीकडे मध्य प्रदेशासारखी राज्यं आहेत ज्यांची वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची मागणी पूर्ण करेल, इतकं उत्पादन करण्याची क्षमता नाही, तर दुसरीकडे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांकडची ऑक्सिजनची मागणी वाढतेय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








