सेप्टिक शॉक : प्रणव मुखर्जी यांचे ज्यामुळे निधन झाले तो 'सेप्टिक शॉक' काय असतो?

सेप्टिक शॉकः प्रणव मुखर्जी ज्यामुळे वारले तो सेप्टिक शॉक काय असतो?

फोटो स्रोत, Getty Images

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 84 व्या वर्षी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांचा मृत्यू सेप्टिक शॉकमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे.

त्याचवेळी त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती.

सेप्सिस म्हणजे काय?

जेव्हा आपली रोगप्रतिकाशक्ती एका मर्यादेच्या पलिकडे कार्य करते तेव्हा जे इन्फेक्शन होते त्याला सेप्सिस असं म्हटलं जातं. हे इन्फेक्शन कोणत्याही मार्गाने होऊ शकतं. उदाहरणार्थ कापणं, कीडा चावणं अशा कोणत्याही माध्यमातून ते होऊ शकतं.

सामान्यतः अशा इन्फेक्शनच्यावेळेस आपली प्रतिकारक्षमता तात्काळ कार्यरत होऊन त्याचा प्रसार थांबवते. परंतु जर इन्फेक्शन वेगाने पसरलं तर त्या प्रमाणात प्रतिकारक्षमताही वेगाने काम करायला लागते आणि इन्फेक्शनशी जास्त क्षमतेने लढायचा प्रयत्न करते.

याचाच धक्का शरीराला बसू शकतो. त्यामुळे सेप्टिक शॉकची स्थिती येऊन अंतर्गत अवयव बंद पडणे आणि अगदी मृत्यू ओढावण्याची स्थिती येऊ शकते.

याला आपल्याच शरीरात लपलेला मारेकरी असं म्हटलं जातं. कारण ते शोधण्याची ठोस चाचणी किंवा ठोस लक्षणं दिसून येत नाहीत.

त्याची लक्षणं अशी स्पष्ट नसल्यामुळे कधीकधी ते एखाद्या फ्लूच्या रुपाने, पोटातलं इन्फेक्शन किंवा छातीचं इन्फेक्शन अशा स्वरुपात समोर येऊ शकतं. अशा रुग्णांमध्ये श्वासोच्छवास अनियमित होणं, अंगावर पुरळ येणं, त्वचेचा पोत बदलणं असे बदल दिसून येतात.

लक्षणं स्पष्ट नसल्यामुळे त्याचं निदान करणं कठीण असते. त्यामुळे लवकरात लवकर रुग्णावर उपचार सुरू करून त्याला अँटिबायोटिक्स देणं गरजेचं असतं. सेप्सिस हे दुसऱ्या कोणाद्वारे आपल्या शरीरात येत नाही.

सेप्सिसची प्रौढांमध्ये दिसलेली लक्षणं-

1)बोलताना अडखळणं

2)फार थंडी वाजणं, स्नायू दुखणं

3)दिवसभरात लघवी न होणं

4)हृदयाचे ठोके वेगाने पडणं

5)शरीराचे तापमान वाढणं किंवा कमी होणं

सेप्सिसची लहान मुलांमध्ये दिसलेली लक्षणं-

1)त्वचेचा रंग बदलणं, लाल-जांभळे ठिपके दिसणं

2)अत्यंत आळस येणं, अंथरुणातून उठावेसे न वाटणं

3)त्वचेला हात लावल्यावर एकदम थंड पडल्याचं जाणवणं

4)श्वास वेगाने सुरू होणं

5)पुरळ येणं

6)स्नायू सतत आंकुचन आणि प्रसरण पावणं

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)