सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, वर्किंग कमिटीचा निर्णय

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच राहतील, असा निर्णय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ANI या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
पुढील सहा महिन्यात नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल, असंही या बैठकीत ठरलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सात तास चाललेली काँग्रेस वर्किंग कमिटीची ही बैठक बरीच वादळी ठरली.
राहुल गांधी विरुद्ध ज्येष्ठ नेते
काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी पक्षात सुधारणांसाठी पत्र लिहिलं, त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं नसल्याचं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं.
गुलाम नबी आझाद यांच्या आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्या कथित टिप्पणीवर ट्वीट केलं होतं. नंतर राहुल गांधींनी असं काही म्हटलं नव्हतं, असं म्हणत त्यांनी हे ट्वीट काढून टाकलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून, पक्षात मोठ्या बदलाची गरज व्यक्त केली. त्यानंतर पक्षात स्पष्टपणे दोन गट दिसून येत आहेत.
एक गट सामूहिक नेतृत्त्वाची मागणी करतंय, तर दुसरा गट नेहरू-गांधी कुटुंबावर विश्वास व्यक्त करतंय. राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. जर भाजपबरोबर हातमिळवणी केल्याचं सिद्ध झालं तर आपण राजीनामा देऊ असं गुलाम नबी आझाद यांनी सांगितल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, CWC च्या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा सादर करू शकतात.
एकीकडे बैठकीत काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षपदावरून धुमश्चक्री सुरू असताना, दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्यासारख्या वरिष्ठ काँग्रेस नेत्याने ट्विटरवरून जाहीरपणे राहुल गांधी यांचं नाव घेऊन उत्तर दिलं होतं. मात्र काही वेळानंतर त्यांनी ते ट्वीट मागे घेतलं.

फोटो स्रोत, @KapilSibal
"राहुल गांधी म्हणतात, आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली. राजस्थान हायकोर्टात पक्षाचा बचाव केला, मणिपूरमध्ये भाजपसमोर पक्षाला वाचवलं, गेल्या 30 वर्षांपासून भाजपला पूरक एकही मत व्यक्त केलं नाही, तरीही आमची भाजपशी हातमिळवणी?" असा थेट सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला होता. मात्र त्यानंतर असं वक्तव्य आपल्याला उद्देशून केल्याचं राहुल गांधी यांनी स्वतः मला कळवल्यामुळे मी ट्वीट डीलिट करत आहे असं नवं ट्वीट कपिल सिब्बल यांनी केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून, पक्षात मोठे बदल करण्याची गरज व्यक्त केली. याच मुद्द्यावरून काल (23 ऑगस्ट) दिवसभर काँग्रेसमधून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या.
सोनिया गांधी या पदावरून पायउतार झाल्यास राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सांभाळावं, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केली. महाराष्ट्रासह काही राज्यांनी तर प्रदेश कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर करून राहुल गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला.

फोटो स्रोत, PTI
काही दिवसांपूर्वी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घ्यावी, असं वक्तव्य काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केले होते. तेव्हापासूनच खरंतर माध्यमांमध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, कालच्या पत्रामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आणि आजच्या बैठकीत यावर अंतिम निर्णयाचीही अपेक्षा व्यक्त केली जातेय.
गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्व करणार?
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी-नेहरू घराण्याच्या बाहेरील व्यक्तीने आता अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी असे मत त्यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
काँग्रेस समितीने राहुल गांधींची ही भूमिका अमान्य केली. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वपदाची जबाबदारी आली.
आता वर्षभरानंतर प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गांधी कुटुंब आणि अध्यक्षपदाची रखडलेली निवड याविषयीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसने आपला मार्ग शोधावा असं म्हणत अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असं त्या म्हणाल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षातले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांची 'यंग ब्रिगेड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी बंडाचा पवित्रा घेतला.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम केला आणि ते भाजपमध्ये गेले. राहुल गांधींच्या जवळचे असणारे दुसरे नेते सचिन पायलट यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे खासदार राजीव सातव यांनीही नव्या वादाला तोंड फोडलं.
केंद्रात सत्ताधारी भाजप पक्षाला हरवायचे असेल तर सर्वप्रथम काँग्रेसला सक्षम होणं गरजेचं आहे हे काँग्रेस नेत्यांनाही मान्य आहे. पण काँग्रेसमधला अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर निवड करण्यासाठी काही काँग्रेस नेते आग्रही आहेत. गेल्या वर्षभरात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेतृत्वपदासाठी एकही नाव समोर आलेले नाही.
गांधी कुटुंबाच्या समर्थनासाठी दिग्गज मैदानात
ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच पक्षाचं नेतृत्त्व करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ट्विटरवरून तसं मत व्यक्त केलं आहे.
"देशातील जुलूमशाहीविरोधात आणि घटनात्मक मूल्यांच्या संरक्षणासाठी कुणी ठामपणे उभं राहिलं असेल, तर ते म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधीच. आम्हाल माहित आहे तुम्ही अडचणींना तोंड देत आहात. मात्र, तरीही माझी प्रामाणिक विनंती आहे की, तुम्ही पक्षाचं नेतृत्त्व करत राहावं. इतर कुणाहीपेक्षा तुमच्या हातातच पक्ष सुरक्षित राहील," असं कुमार केतकर यांनी मत मांडलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीनं प्रस्ताव मंजूर करत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. सोनिया गांधी यांनी पक्षाचं नेतृत्त्व करावं, मात्र त्यांनी नकार दिल्यास राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, असा प्रस्ताव मंजूर करत पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
दुसरीकडे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'कम बॅक, राहुल जी' म्हणत राहुल गांधींना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.
राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अनुक्रमे अशोक गहलोत, भूपेश बघेल आणि कॅप्टन अमरिंदरसिंह यांनीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच जाहीर पाठिंबा दिलाय. अशोक गहलोत यांनी तर सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पाठवलेल्या पत्राबाबत नाराजीही व्यक्त केलीय.

फोटो स्रोत, Twitter
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)