राम मंदिराला समर्थन करणं काँग्रेसची अपरिहार्यता आहे का?

प्रियंका गांधी

फोटो स्रोत, Reuters

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी

भारतात कोरोनाचं गंभीर संकट ओढवलं असलं, तरी गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र राम मंदिराच्या भूमीपूजनाची चर्चाही सुरू आहे. पाच ऑगस्ट रोजी राम मंदिराचं भूमीपूजन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असे काही नेते या कार्यक्रमाला अयोध्येत उपस्थित राहतील.

खरंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राम मंदिराची उभारणी केली जात आहे. मात्र, भूमीपूजनच्या कार्यक्रमाचा प्रचार पाहिल्यास, जणू हा भाजपचा पक्षीय कार्यक्रम असल्याचा भास व्हावा असा दिसून येतो.

प्रियंका गांधी

फोटो स्रोत, Getty Images

राम मंदिराच्या समर्थनासाठी प्रियांका गांधींकडून पत्रक जारी

हेच लक्षात घेऊन किंवा अन्य कारणांमुळे काँग्रेसच्या गोटातूनही तातडीने राम मंदिर उभारणीच्या समर्थनार्थ नेतेमंडळी धावून आली आहेत. दस्तुरखुद्द काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पत्रक काढून राम-सीतेसह संपूर्ण रामायणाचं महत्त्व सांगणारं पत्रक जारी केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुता आणि सांस्कृतिक सौख्याचा संदेश देणारा ठरो, अशी आशा प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलीय.

दुसरीकडे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी तर प्रदेश काँग्रेसकडून थेट चांदीच्या 11 विटाच अयोध्येकडे धाडल्या आहेत आणि राम मंदिर भूमीपूजनाचा दिवस देशासाठी ऐतिहासिक असल्याचा त्यांनी म्हटलं. शिवाय, श्री हनुमान चालीसा पाठचं खास आयोजनही त्यांनी केलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राम मंदिर आंदोलनाचा इतिहास पाहिल्यास 1993 साली काय झालं, हे सर्वश्रुत आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्याच ठिकाणी राम मंदिर बांधण्याची मागणी होती. तेव्हापासून सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरू होतं. गेल्यावर्षी कोर्टानं राम मंदिर बांधण्याची परवानगी दिली.

विशेष म्हणजे, 'धर्मनिरपेक्ष' काँग्रेसनं राम मंदिर-बाबरी मशि‍दीच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडणं कायमच टाळाटाळ केलेली दिसते. मात्र, आता राम मंदिर भूमीपूजनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आजवरची आपलीही मागणी मंदिर उभारणीची होती, अशा पद्धतीने पुढे आल्याची दिसून येते.

ओवेसींची प्रियांका गांधींवर टीका

काँग्रेसच्या आजच्या भूमिकेवर म्हणूनच सर्वत्र टीका होताना दिसतेय. AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रियंका गांधी यांच्या ट्वीटला उत्तर देत म्हटलंय की, "आता हे ढोंग करत नाहीत याचा आनंद आहे. कट्टर हिंदुत्त्व विचारधारेला जवळ करू पाहत असल्यास ठीक आहे, पण मग या बंधुत्त्वाच्या गोष्टी का करता आहात?"

"बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या आंदोलनात तुमच्या पक्षानं योगदान दिल्याचा अभिमान वाटून घेण्यास लाजू नका," असंही ओवेसी यांनी प्रियांका गांधींना उद्देशून म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

दोन-तीन महिन्यांवर बिहारच्या निवडणुका आणि दोन-अडीच वर्षांवर उत्तर प्रदेशच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. राम मंदिराचा मुद्दा उत्तर भारतातल्या निवडणुकांमध्ये कायमच उपस्थित होत असतो. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही राम मंदिराच्या मुद्द्याला महत्त्व आलं आहे. हेच तर कारण काँग्रेसच्या समर्थनाला नसेल? की आणखी काही कारणं आहेत, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं घेतला आहे.

'बहुसंख्याकवादाच्या राजकारणासाठी राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा'

एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक मनोरंजन भारती यांनी गेली अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणाचं वार्तांकन केलं आहे. त्यांच्याशी बीबीसी मराठीनं याबाबत चर्चा केली.

मनोरंजन भारती म्हणतात, "आजचं बदललेलं राजकारण पाहता, काँग्रेसला नक्कीच असं वाटत असावं की, राम मंदिराच्या मुद्द्यापासून आपण वेगळं राहू शकत नाही. त्यामुळे प्रियंका गांधी यांनी विशेष पत्रक काढून भूमिका मांडली आहे. श्रीराम आमचेही आहेत, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय."

प्रियंका गांधी

फोटो स्रोत, AFP

"इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे, काँग्रेस पक्षाकडून काहीच बोललं गेलं नाहीय. पत्रक काढलं तेही प्रियंका गांधी यांनी. बहुसंख्याकवादाचं राजकारण करायचं झाल्यास काँग्रेस स्वत:ला राम मंदिराच्या मुद्द्यापासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळेच पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या प्रियंका गांधी यांनी जाहीरपणे पत्रक काढत समर्थन केलंय," असंही मनोरंजन भारती सांगतात.

मनोरंजन भारती हे काँग्रेसच्या इतिहासातील घडामोडींचाही दाखला देतात.

ते म्हणतात, "सॉफ्ट हिंदुत्त्वाबाबत काँग्रेसमध्ये कायमच वाद-विवाद होत राहिलाय. खूप वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते विठ्ठलराव गाडगीळ या सॉफ्ट हिंदुत्त्वाचे पुरस्कर्ते होते. तेव्हापासूनच काँग्रेसमध्ये याबाबत चर्चा होत आल्यात की, बहुसंख्याकवादापासून आपण वेगळं राहायला नको."

'काँग्रेस प्रवाहानुसार झुकणारा पक्ष'

ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे अभ्यासक असलेले रशीद किडवई मात्र यावर थोडी वेगळी भूमिका मांडतात. राम मंदिराबाबत काँग्रसनं आता घेतलेली भूमिका त्यांना अपरिहार्य किंवा संधीसाधू वाटत नाही.

रशीद किडवई म्हणतात, "राम मंदिराच्या मुद्द्यावर काँग्रेसची सुरुवातीपासूनच भूमिका अशी होती की, एकतर दोन्ही समूहांनी चर्चेतून प्रश्न सोडवावा किंवा कोर्टाचा जो निर्णय येईल तो मान्य करावा. आता कोर्टाचा निर्णय आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसनं समर्थन केल्यास वावगं असं काहीच नाही."

प्रियंका गांधी, राहुल गांधी

फोटो स्रोत, Reuters

"दुसरं म्हणजे, लोकांचा कल जिकडे असतो, तिकडे काँग्रेस झुकत आलीय. काँग्रेस काही आरएसएस-भाजप किंवा डाव्या विचारांचा पक्ष नाहीय, जे स्वत:च्या विचाधारेवर चालत आलेत. प्रवाहानुसार काँग्रेस वळणं घेत आली आहे," असंही किडवाई यांचं म्हणणं आहे.

शिवाय, "हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आजच्या घडीला काँग्रेस भाजपशी स्पर्धा करू शकत नाही. मात्र, काँग्रेस केवळ मुस्लिमांचा पक्ष आहे, असा संदेश काँग्रेस देऊ पाहत नाहीय. त्यामुळे आजची काँग्रेसची भूमिका दिसून येते," असंही किडवाई म्हणतात.

काँग्रेसच्या आजच्या भूमिकेला दोन-अडीच वर्षांनी येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका किंवा दोन-अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या बिहारच्या निवडणुका कारणीभूत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतो.

उत्तर प्रदेश किंवा बिहार निवडणुकांशी काँग्रेसच्या भूमिकेचा संबंध?

उत्तर प्रदेश आणि बिहार हे दोन्ही हिंदी पट्ट्यातील राज्य आहेत आणि हिंदुत्त्वाची जनभावना या पट्ट्यात तीव्र मानली जाते.

मात्र, मनोरंजन भारती यांना बिहारबाबत हे पटत नाही. ते म्हणतात, "बिहार आणि उत्तर प्रदेशमधील राजकीय स्थिती वेगळी आहे. मुस्लिमांच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेशमध्ये जे मत आहे, ते बिहारमध्ये दिसून येत नाही. कारण बाबरी मशिदीची घटना उत्तर प्रदेशात झालीय. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील लोकांची जवळीक वेगवेगळी आहे. राम मंदिर बांधलं जावं, हे दोन्ही राज्यातील लोकांना वाटतं, पण उत्तर प्रदेशात याची तीव्रता जास्त आहे. बिहारमध्ये आजच्या घडीला तरी बिहारी अस्मितेच्या नावाखाली सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा मोठा बनताना दिसतोय."

प्रियंका गांधी, राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, उत्तर प्रदेशबाबत मनोरंजन भारती म्हणतात, "उत्तर प्रदेशच्या निवडणुका येईपर्यंत कदाचित राम मंदिर बांधलंही गेलं असेल. पण अर्थात, प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेशातील सक्रियता पाहिल्यास, काँग्रेसची आजच्या भूमिकेचा संबंध नाकारता येत नाही."

देशातील बदलत्या राजकारणाला अनुसरूनच काँग्रेसनं राम मंदिराबाबत भूमिका घेतल्याची चर्चा असाताना, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याच दोन वर्षांपूर्वीच्या वक्तव्याचीही बरेच जण आठवण काढू लागले आहेत.

सोनिया गांधींचं 'ते' विधान आता का महत्त्वाचं आहे?

राम मंदिराबाबत प्रियांका गांधी यांनी विशेष पत्रक जारी केलंय, तर इतर काँग्रेस नेत्यांनीही विविध माध्यमांतून भूमीपूजनच्या कार्यक्रमाशी स्वत:ला जोडून घेतलं आहे.

हे पाहता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचं 2018 सालचं विधान खूप महत्त्वाचं आहे आणि त्या विधानाची आजच्या प्रसंगाशी नेमका संबंध जोडता येईल.

2017 साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी गुजरातमधील विविध मंदिरांना भेटी दिल्या. काँग्रेसला अचानक मंदिरांची आठवण झाली का, अशी त्यावेळीही टीका झाली होती.

राहुल गांधी, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर 2018 मध्ये इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना यासंबंधी प्रश्नही विचारला गेला.

त्यावेळी सोनिया गांधींनी म्हणाल्या होत्या, "ब्रेनवॉश केलंय असं मी म्हणणार नाही, पण भाजपनं हे लोकांना पटवून देण्यात यश मिळवलंय की, काँग्रेस केवळ मुस्लिमांचा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये सर्वाधिक हिंदू आहेत. अर्थात, मुस्लिमही आहेतच. त्यामुळे आमचा पक्ष मुस्लीम कसा, हे मला कळत नाहीय."

"राजीव गांधींसोबत दौऱ्यावर गेल्यावर अनेकदा मंदिरांना भेटी देत असे. मात्र, ते श्रद्धेतून होतं. त्याचा गवगवा करण्याची गरज वाटली नाही. राहुलही आधी अनेकदा मंदिरात गेलाय," असंही सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)