You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अस्थायी सदस्यपदी भारताची निवड
भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या 193 व्या आमसभेत भारताला 184 मतं मिळाली आहेत. भारत 2021-22 पर्यंत संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च संस्थेचा अस्थायी सदस्य असेल.
बुधवारी (17 जून) झालेल्या या निवडप्रक्रियेत भारताशिवाय आयर्लंड, मेक्सिको, नॉर्वे यांचीही निवड झाली आहे.
2021-22 या कालावधीसाठी भारत आशिया प्रांतातून उमेदवार होता. या भागातून भारत एकमेव उमेदवार असल्याकारणानं भारताचा विजय निश्चित होता. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातील 55 सदस्य समूहांनी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
यापूर्वी भारत 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-2012 अशा सात वेळेस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य राहिला आहे.
बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 75 व्या सत्रासाठी अध्यक्षाची निवड, सुरक्षा परिषदेच्या 5 अस्थायी सद्स्य देशांची निवड आणि आर्थिक व सामाजिक परिषदेच्या सदस्यांची निवड करण्यात आली. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे विशेष मतदान प्रक्रियेद्वारे ही निवड करण्यात आली.
भारताला संयुक्त राष्ट्र परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून पसंती दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे आभार मानले आहेत.
त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, भारत सगळ्या देशांबरोबर मिळून शांतता, सुरक्षा आणि समतेला प्रोत्साहन देण्याचं काम करेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)