You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद राहणार?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीने महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झालाय. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊनची मुदत 31 मे पर्यंत वाढवली आहे.
या लॉकडाऊनसंदर्भात नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात आता रेड झोन आणि बिगर रेड झोन असे दोनच विभाग असतील.
रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिकांचा समावेश आहे. उर्वरित भाग बिगर रेड झोन क्षेत्र असेल.
रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर झोनमध्ये सलून सुरू राहील, असं महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलंय.
रेड झोनमध्ये काय सुरू राहील?
- अत्यावश्यक सेवेची दुकानं
- दारुची दुकानं होम डिलिव्हरी
- मेडिकल, ओपीडी
- सरकारी ऑफिसेस (5 ते 10 टक्के कर्मचाऱ्यांसह)
- बँका
- नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय
अधिक माहितीसाठी हा तक्ता पाहा-
आतापर्यंत तीन लॉकडाऊन झाले :
- पहिला लॉकडाऊन - 24 मार्च ते 14 एप्रिल
- दुसरा लॉकडाऊन - 15 एप्रिल ते 3 मे
- तिसरा लॉकडाऊन - 3 मे ते 17 मे
- चौथा लॉकडाऊन 18 मे ते 31 मे
लॉकडाऊनबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी काय सांगितलं होतं?
कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन-4 असेल यात शंकाच नाही, मात्र कंटेनमेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन कसे असेल, याबाबत शासन-प्रशासनाशी चर्चा करूनच माहिती दिली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. मात्र, आता संपूर्ण राज्यभरच चौथं लॉकडाऊन असेल, असं पत्रकाद्वारे सांगण्यात आलंय.
दारुच्या दुकानांबाबत लॉकडाऊन-4 साठी आधीच निर्णय झालाय. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारानं परवानाधारक दारुची होम डिलिव्हरी सुरू केलीय. तीन-चार दिवसांपूर्वीच यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्रात उत्पादन शुल्क विभागानं घोषित केलाय.
सविस्तर बातमी : घरपोच दारु मिळवण्यासाठी 'या' आहेत अटी
चौथ्या लॉकडाऊनबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले होते, "ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील दुकानं, नोंदणीची कामं, गाड्यांची खरेदी-विक्री सुरू होईल. मात्र, रेड झोनबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेनंतरच ठरेल."
"होप फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट अशा पद्धतीनं काम केलं जातंय. मुंबईत व्हेंटिलेटरची सुविधा असलेले एक हजार ICU बेड्स, एक लाख CCC बेड्स, 15 हजार DCHC बेड्स अशी तयारी करण्यात आलीय," अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
केंद्रीय पोलीस दलाच्या 9 तुकडे महाराष्ट्रात दाखल
चौथ्या लॉकडाऊनची नीट अंमलबजावणी व्हावी म्हणून केंद्रीय पोलीस दलाच्या 9 तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अनिल देशमुख म्हणाले, "महाराष्ट्रातील पोलीस अविरत काम करत आहेत. त्यामुळं त्यांनाही विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणूनच आम्ही केंद्राला विनंती केली होती की, केंद्रीय पोलीस दलाच्या 20 तुकड्या महाराष्ट्रात पाठवाव्यात. त्यापैकी आतापर्यंत 9 तुकड्या महाराष्ट्रात आल्या आहेत. मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि अमरावतीत आम्ही या तुकड्या तैनात केल्या आहेत. रमझान, आषाढी वारी, गणेशोत्सव आहे. अशावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल मदतीला येईल."
राज्य सरकारच्या सूचनांचं सर्व लोकांना पालन करावं, असं आवाहन देशमुखांनी केलीय.
अडकलेल्या मजुरांबाबत काय?
"महाराष्ट्रातून 224 रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांना आपापल्या राज्यात पोहोचवलंय. मजुरांना आपापल्या राज्यात पोहोचवण्यासाठी आणखी मदत सुरूच आहे. प्रवसाचा सर्व खर्च राज्य सरकार करत आहेत," अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
"महाराष्ट्रात अजून 700-800 रेल्वेगाड्यांची मदत आहे. आम्हाला रेल्वेगाड्यांची मदत मिळते सुद्धा आहे. मात्र, समोरील राज्यांनी आपापल्या मजुरांना घेण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. समोरील राज्यांनी परवानगी लवकरात लवकर दिली पाहिजे," असेही देशमुख म्हणाले.
कालच मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, "महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून स्थलांतरित मजूर, कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोडण्याची सोय करण्यात आलीय. आतापर्यंत 11 हजार 379 बसेसद्वारे सुमारे 1 लाख 41 हजार 798 स्थलांतरित मजूर रवाना झाले आहेत."
तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करताना केंद्र सरकारनं देशातील सर्व जिल्ह्यांची झोननिहाय विभागणी केली. रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन करण्यात आले. महाराष्ट्रातही अशी विभागणी झाली.
त्यानंतर झोननिहाय लॉकडाऊनमध्ये काही नियम कडक, तर काही नियम शिथीलही करण्यात आले.
चौथ्या लॉकडाऊनसाठी स्वतंत्र घोषणा जाहीर होत नाहीत, तोपर्यंत तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये नियम लोकांना चौथ्याही लॉकडाऊनमध्ये पाळावे लागणार आहेत. कारण महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकानुसार सध्या सुरू असलेलं लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आलंय.
महाराष्ट्रातील कुठले जिल्हे कुठल्या झोनमध्ये आहेत आणि कुठल्या झोनमध्ये कुठल्या गोष्टींना परवानगी आहे, यासाठी बीबीसी मराठीच्या खालील दोन बातम्या तुम्ही वाचू शकता :
दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "चौथ्या लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये कोणत्या कोणत्या सवलती दिल्या जातील, याबाबत लवकरच राज्य सरकार जाहीर करेल."
लॉकडाऊन 3.0मध्ये काय सुरू, काय बंद?
राज्यात नेमक्या कोणत्या गोष्टी कुठे सुरू राहतील, यासंदर्भात एक कोष्टक सरकारने लॉकडाऊन 3.0ची घोषणा करताना जाहीर केलं होतं.
नागरिकांना रोजच्या जगण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भाजीपाला, दूध, किराणा यांचा पुरवठा ग्रीन, ऑरेंज, रेड, कंटेनमेंट तसंच महापालिका क्षेत्रात सुरू राहील. सर्व झोनमध्ये औषधांची दुकानं, दवाखाने नागरिकांसाठी सुरू राहतील.
ग्रीन झोनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने तिथे बऱ्याच आस्थापनांना कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
रेड झोनमध्ये कठोर निर्बंध लागू असतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)