कोरोना व्हायरस : राज ठाकरे यांनी लॉक डाऊनबाबत मांडलेले 9 मुद्दे

राज ठाकरे यांनी कोरोना व्हायरस संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारची स्तुती सुद्धा केली आहे.

राज ठाकरे यांची पत्रकार परिषदेतले 9 महत्त्वाचे मुद्दे -

  • जर कोरोना व्हायरस पसरला तर देशातल्या 60 ते 65 टक्के लोकांना हा विळखा घालू शकतो.
  • रविवारी संध्याकाळी 5 वाजता लोकांना एकत्र यायला सांगितलं, तेव्हा लोक जत्थे करून बाहेर आले. हे प्रकरण इतक्या सहजपणे घेऊ नका.
  • उद्या युद्ध झालं असतं, तर ज्याचं हातावर पोट आहे, त्यानं काय केलं असतं?
  • आज बाहेर गर्दी करणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की काही दिवस घरात बसा. जे काही सुरू आहे, ते आपल्यासाठीच सुरू आहे.
  • पोलीस, डॉक्टर यांनाही कुटुंब आहे. पण, ते जीव धोक्यात घालून आपल्यासाठी रस्त्यावर आहेत.
  • मूठभर लोकांना या व्हायरसचं गांभीर्य कळालेलं नाही. ते बाहेर पडत नाही.
  • मजुरांचं काम बंद झालं, तर त्यांनी काय करावं, हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही संबंधित संस्था, कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं.
  • अनेकांच्या हातावर स्टॅम्प मारले असतानाही ते बाहेर पडलेत, लोकांनी हे गांभीर्यानं घ्यावं.
  • मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे, ते यावर काम करत आहेत. लोकांनी ऐकलं नाही तर त्यांना कठोर पावलं उचलावी लागतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)