You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Pakistan मध्ये अभिनंदन यांची 'भारत माता की जय'ची घोषणा: बीबीसी मराठी राउंडअप
1. अभिनंदन यांची पाकिस्तानात 'भारत माता की जय'ची घोषणा : BBC Exclusive
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची पाकिस्तान उद्या म्हणजेच शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत केली आहे.
शांततेचं पाऊल म्हणून आम्ही सुटका करत आहोत, असं इम्रान खान म्हणाले.
पण अभिनंदन वर्तमान यांना नेमकं कुठल्या परिस्थितीत पकडण्यात आलं. त्याच वेळी नेमकं काय घडलं याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे.
2. किम यांच्याबरोबरच्या चर्चेतून ट्रंप का 'उठून गेले'?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि नॉर्थ कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्यातील व्हिएतनामच्या हॅनोईमध्ये झालेली भेट कोणत्याही ठोस कराराशिवायच आटोपली.
उत्तर कोरियावर असलेले निर्बंध उचलण्यात यावे, अशी किम यांची मागणी होती जी अमेरिकेनं धुडकावून लावली.
"निर्बंधांवरून काही करार होऊ शकला नाही. उत्तर कोरियावरचे सर्व निर्बंध पूर्णपणे उठवण्यात यावेत, अशी त्यांची मागणी होती. हे आम्ही करू शकत नाही," असं ट्रंप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सविस्तर वृत्त वाचा बीबीसीवर.
3. पाकिस्तान आणि भारतात अणुयुद्धाची शक्यता किती?
"जी स्थिती कधीही पाहिली नव्हती त्या स्थितीमध्ये सध्या हे दोन्ही देश आहेत," भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या स्थितीवर पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानींनी केलेलं, हे भाष्य खूप काही सांगून जातं.
हुसैन हक्कानी हे अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत होते आणि आतापर्यंत तीन पंतप्रधानांबरोबर त्यांनी सल्लागाराचं काम केलं आहे. नुकतंच त्यांनी 'रिइमॅजनिंग पाकिस्तान- ट्रान्सफॉर्मिंग अ डिसफंक्शनल न्युक्लियर स्टेट' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
बीबीसीनं त्यांच्याकडून एकूण परिस्थिती काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे विश्लेषण या ठिकाणी वाचा.
4. पाकिस्तानच्या वायुदलाची भिस्त अमेरिकी विमानांवर
तो दिवस होता 13 एप्रिल 1948. पाकिस्तानातल्या रिसालपूरमध्ये मोहम्मद अली जिन्ना रॉयल पाकिस्तान आर्मी फोर्सच्या म्हणजेच RPFच्या सदस्यांना भेटले.
त्यावेळेस जिन्ना म्हणाले होते, "पाकिस्तानने आपलं वायुदल शक्य तितक्या लवकर तयार केलं पाहिजे. तसंच ते एक सक्षम वायुदल असलं पाहिजे. पाकिस्तानच्या संरक्षणासाठी नौदल आणि लष्कराबरोबर ते सज्ज राहिलं पाहिजे."
त्यांच्या या वक्तव्यानंतर जवळपास 70 वर्षांनी पाकिस्तानचं वायुदल (PAF) चर्चेत आलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या वायुदलांची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. बालाकोटमध्ये भारताने केलेला हल्ला आणि भारताची दोन विमानं पाकिस्ताननं पाडली आहेत. त्यानिमित्तानं पाकिस्तानच्या वायुदलावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
5. पाकिस्तान नाही तर चीन आहे भारताचा खरा शत्रू : माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस
भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी वायुसेनाप्रमुख अनिल टिपणीस यांच्याशी बीबीसी मराठीने चर्चा केली.
पाकिस्तान आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर जर युद्ध झालं तर भारताचे स्क्वॉड्रन कमी पडतील, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे आधीचं सरकार वायुदलातील स्क्वॉड्रन सशक्त करायला कमी पडलंय का?
वाचा माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस यांचा संरक्षणविषयक दृष्टिकोन.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)