You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज – भारतीय लष्कर
पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं होतं, असा दावा भारतीय लष्करानं केलं आहे.
"पाकिस्ताननं खुल्या जागेत हल्ला केल्याचा दावा खोटा आहे. त्यांनी लष्करी तळांना लक्ष्य केलं. पण त्यांना कुठलीही इजा पोहोचवता आली नाही. भारतीय लष्करानं त्यांना तात्काळ प्रत्युत्तर दिलं," असं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
ब्रिगेड आणि बटालियन हेडकॉर्टरला पाकिस्ताननं टार्गेट केलं होतं, असा दावा भारतीय लष्कारनं केला आहे.
भारताच्या तिनही सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
भारताच्या हवाई दलानं प्रत्युत्तर देत पाकिस्तानचं एफ-16 विमान खाली पाडलं. पण तेही त्यांनी मान्य केलं नाही. पण पाकिस्ताननं एफ-16 विमानं वापरली याचा पुरावा आमच्याकडं आहे, असं भारतीय लष्करानं सांगितलं.
भारतीय नौदल, हवाई दल आणि भुदल पूर्णपणे सज्ज आहेत, असं तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका करून पाकिस्ताननं शांततेचा हात पुढे केला आहे का? असं विचारलं असता, भारतीय अधिकाऱ्यांनी 'नाही' असं उत्तर दिलं. पाकिस्ताननं केवळ जिनेव्हा कराराचं पालन केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
भारतीय लष्कराचे मेजर जनरल सुरेंद्र सिंह बहल, हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल आरजीके. कपूर, नौदलाचे रिअर अॅडमिरल दलबीर सिंह गुजराल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान भूमिका मांडली.
बालाकोट कारवाईनंतर आतापर्यंत पाकिस्तानं जवळजवळ 35वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, असं मेजर जनरल सुरेंद्र सिंह बहल यांनी सांगितलं.
भारतीय हवाई दलाच्या कारवाईत पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये किती लोक मारले? असं विचारलं असता हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल आरजीके. कपूर म्हणाले, "त्याठिकाणी कितीजण मारले याचा आमच्याकडं पुरावा आहे. एकूण कितीजण मारले हे सांगण्यात आता घाई होईल. आम्हाला जी ठिकाणं नष्ट करायची होती ती आम्ही केली आहेत. याचे सगळे पुरावे आम्ही सरकारला दिले आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)