You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विजय मल्ल्या यांना वरच्या कोर्टात अपील करण्याचा हक्क - कायदेतज्ज्ञ #बीबीसीमराठीराऊंडअप
1. वरच्या कोर्टात अपील करण्याचा मल्ल्या यांना हक्क - कायदेतज्ज्ञ
भारतीय बॅंकांचे कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवण्याचा आरोप असलेले आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या प्रत्यपर्णाला ब्रिटन सरकारनं मंजुरी दिली आहे.
ब्रिटन सरकारचे गृह सचिव साजिद जावेद यांनी सोमवारी विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. त्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरीही केली आहे.
अर्थात साजिद जावेद यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यासाठी मल्ल्या यांना 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
विजय मल्ल्या यांना वरच्या कोर्टात अपील करण्याचा हक्क आहे. असं कायदेतज्ज्ञ सरोश झाईवाला यांनी म्हटलं आहे. याबाबतच सविस्तर वृत्त इथं वाचा.
2. अनिल अंबानींची आरकॉम दिवाळखोरीत का निघाली?
एकेकाळी अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन अर्थात आरकॉम देशातली दुसरी मोठी टेलिकम्युनिकेशन कंपनी होती. पण आता ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे.
आणि अर्थातच आर कॉमचं हे हाल प्रतिस्पर्धी कंपन्यांनी केलेत. ज्यात त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांच्या जियोचाही मोठा वाटा आहे.
शेअर बाजारातील तोट्यानं आरकॉमचं कंबरडं मोडलं. गेल्या काही वर्षापासून आरकॉम आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी लढत होती. पण अखेर कर्जबाजारीपणावर उपाय शोधण्यासाठी कंपनीनं कोर्टात अर्ज दाखल केला आहे.
सात अरब डॉलरच्या कर्जाचं पुनर्गठण करण्यात अपयश आल्यानंतर रिलायन्सने ही घोषणा केली आहे. 13 महिन्यांआधी कर्ज देणाऱ्यांनी यावर सहमती दर्शवली होती. पण त्यावर पुढं काही झालेलं नव्हतं.
या संदर्भातलं सविस्तर वृत्त तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
3. तुम्हाला 'सुपरबोल' खेळाबद्दल काही माहिती आहे?
बहुचर्चित सुपरबोलच्या सामन्यात द न्यू इंग्लंड पॅट्रियट्स संघाने लॉस एंजेलिस रॅम्सवर 13-3 असा दणदणीत विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली.
या विजयासह लॉस एंजेलिस रॅम्सने सुपरबोलच्या सर्वाधिक जेतेपदाच्या पिट्सबर्ग स्टीलर्स संघाच्या सहा जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली.
पॅट्रियटचा क्वार्टरबॅक म्हणजेच कर्णधार टॉम ब्रॅडीने सहावी सुपरबोल रिंग पटकावण्याचा मान मिळवला. 66 वर्षीय बिल बेलिचिक सुपरबोलच्या इतिहासातले सगळ्यांत यशस्वी प्रशिक्षक आहेत.
सुपरबोल हा अमेरिकन फुटबॉल विश्वातला अत्यंत लोकप्रिय असा चॅम्पियनशिप सामना आहे. टीव्हीवर पाहताना अमेरिकन फुटबॉल रग्बीसारखा धसमुसळा दिसतो. अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत प्रोटेक्शन गिअर्सची व्यवस्था असते.
पण हा खेळ नेमका काय आहे हे तुम्ही इथं वाचू शकता.
4. ममता बॅनर्जी विरुद्ध CBI : राजीव कुमार नेमके आहेत तरी कोण?
रविवारी रात्री पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय यांच्यातील टोकाच्या वादाचा नाट्यमय अंदाज पाहायला मिळाला.
केंद्र सरकार 'राजकीय सूडबुद्धीनं' कारवाई करत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी रात्रीपासून धरणं आंदोलन सुरू केलंय.
रविवारी रात्री सीबीआयची एक टीम शारदा चिटफंड आणि रोजव्हॅली प्रकरणात चौकशी करण्यासाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचली होती.
मात्र कोलकाता पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांकडे कुठलंही समन्स नसल्याचं सांगत त्यांनाचच शेक्सपिअर सारणी पोलीस स्टेशनमध्ये नेलं.
पण, या प्रकरणामुळे चर्चेत आलेले राजीव कुमार कोण आहेत, या विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
5. जपानच्या तुरुंगांमध्ये का वाढत आहे वृद्धांची संख्या?
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. गेल्या 20 वर्षांपासून 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे.
हिरोशिमामधील एका घरात तुरुंगातून सुटका होऊन आलेल्या लोकांनी आपला एक गट स्थापन केला आहे. तिथं 69 वर्षीय तोशिओ तकाटा यांनी सांगितलं की ते गरीब होते म्हणून त्यांनी कायदा मोडला. त्यांना कुठेतरी मोफत आसरा घ्यायचा होता. अगदी तुरुंगात रहावं लागलं तरी त्यांना चालणार होतं.
"माझं अगदी पेन्शन मिळण्याचं वय झालं आणि मला पैसे कमी पडू लागले. तेव्हा मला ही कल्पना सुचली की आपल्याला तुरुंगातही राहता येईल," ते सांगत होते.
"त्यामुळे मी एक सायकल घेतली, पोलीस स्टेशनला नेली आणि त्यांना सांगितलं की बघा, मी ही चोरली आहे."
ही संपूर्ण बातमी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)