अंध बैलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे जपणारा शेतकरी

व्हीडिओ कॅप्शन, Blind Bull Solapur : अंध बैलाला मुलाप्रमाणे जपणारा शेतकरी

मोहोळच्या वाळूज गावचे शेतकरी इंद्रसेन मोटे यांच्या सोन्या नावाच्या बैलाला डोळ्यांना कँसर झाला होता. त्यामध्ये त्याचे दोन्ही डोळे काढावे लागले. अंध बैलाला संभाळणे खर्चीक ठरू शकते म्हणून गावकऱ्यांनी त्यांना हा बैल विकण्याचा सल्ला दिला. मात्र बैलाला न विकता त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय इंद्रसेन यांनी घेतला. आज 12 वर्ष झालीत ते या बैलाला संभाळत आहेत.

द्रसेन यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनीही पाठींबा दिला. या बैलाच्या उपचारासाठी इंद्रसेन यांना जवळपास 25 हजारांचा खर्च आला. डोळे काढल्यानंतर त्याला शेताच्या कामात वापरल्यावर लोकांनी इंद्रसेन यांच्यावर टिका केली. मात्र ही कामं त्याच्या उपचाराचाच भाग होती असं इंद्रसेन सांगतात.

सध्या इंद्रसेन यांनी सोन्याला रिटायरमेंट दिली आहे. तर याच्या मृत्यू नंतर त्याची समाधी बांधण्याचाही त्यांचा मानस आहे.

रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)