मोहम्मद रफींच्या आठवणी जपणारं मुंबईतलं रफी मॅन्शन
हे आहे मुंबतईतील वांद्रे येथील रफी मेंन्शन. मोहम्मद रफी याच ठिकाणी राहायचे. मोहम्मद रफी यांच्या निधनानंतर यांच्या पत्नीने या सर्व वस्तू त्यांच्या चाहत्यांना पाहाण्यासाठी खुल्या केल्या.
या संग्रहालयात मोहम्मद रफी यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना मिळालेले पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार तसेच त्यांच्या कारकिर्दीत जे सहा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ते सुद्धा इथे ठेवलेले आहेत.
सोबतच त्यांच्या गाण्याच्या ओरीजनल रेकॉर्डसही तुम्हाला इथे ऐकायला मिळतील. एवढंच नाही तर ते वापरत असलेली हार्मोनियम, तंबोरा, त्यांचे टेबल, खूर्ची या गोष्टी सुद्धा तिथे ठेवण्यात आल्या आहेत. तिथे गेल्यावर आपसूकच तुमच्या मनात रफी साहेबांचं गाणं वाजायला लागतं.
या संग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी त्यांचे जावई परवेझ अहमद हे पाहातात.
रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे






