आधुनिक बहिणाबाई - ग्रामीण जीवन कवितांतून मांडणाऱ्या दुसरी पास विमल माळी

व्हीडिओ कॅप्शन, आधुनिक बहिणाबाई - ग्रामीण जीवन कवितांतून मांडणाऱ्या विमल माळी
आधुनिक बहिणाबाई - ग्रामीण जीवन कवितांतून मांडणाऱ्या दुसरी पास विमल माळी

सोलापूरच्या मोहळ तालुक्यातील अनगर येथील विमल माळी या त्यांच्या ग्रामीण कवितांसाठी आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखल्या जातात.

केवळ दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विमल यांना लहानपणापासूनच कवितेची आवड लागली.

लहानपणीच पुस्तकांची साथ सुटलेल्या विमल यांचे हुंकार काळ्या आईचा, रानकाव्य आणि भक्ती जिव्हाळा असे तिन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्या अभिमानानं त्यांची डिग्री 'खुरपं' अशी सांगतात.

दैनंदिन जीवनात येणारे अनुभव विमल या आपल्या कवितांतून सहजपणे मांडतात. त्यांना जवळपास ६०० कविता तोंडपाठ असल्याचं त्या सांगतात.

(रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे)