'या' फॅक्ट्रीत बनतात दिवसाला 25000 इडली, 2000 लीटर सांबार आणि 15000 उडीद वडे
'या' फॅक्ट्रीत बनतात दिवसाला 25000 इडली, 2000 लीटर सांबार आणि 15000 उडीद वडे
ही आहे सांगलीतील इडलीची फॅक्ट्री. या फॅक्ट्रीमध्ये दिवसाला 25000 इडली आणि 2000 लीटर सांबार बनवलं जातं. इथे हॉटेल व्यावसायिकांना होलसेल दरात इडली विकली जाते.
या फॅक्ट्रीचे मालक तिमप्पा शेट्टी हे मुळचे कर्नाटकातले आहेत. तिमप्पा यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 1992 साली ते सांगलीत आले आणि इथेच स्थायिक झाले. मग त्यांनी वेटरची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ इडलीसाठीच दिला.
इडलीशिवाय इथे दिवसाला 15000 उडीद वडे आणि 2000 समोसे बनतात. पदार्थांचा सर्व खर्च जाऊन दिवसाला 25 ते 30 हजार रुपये त्यांना उरत असल्याचं ते सांगतात.
फक्त सांगलीच नाही तर जवळ असलेल्या मिरज, जयसिंगपूर, आष्टा आणि कोल्हापूर या ठिकाणीही साधारण 10 हजार इडली पाठवतो, असं तिमप्पा सांगतात.
रिपोर्ट, शूटिंग आणि एडिटिंग - राहुल रणसुभे






