सीताफळाचे पेटंट घेणारा भारतातील पहिला शेतकरी नवनाथ कसपटे

व्हीडिओ कॅप्शन, सीताफळाचे पेटंट घेणारा भारतातील पहिला शेतकरी नवनाथ कसपटे
सीताफळाचे पेटंट घेणारा भारतातील पहिला शेतकरी नवनाथ कसपटे

बार्शीचे नवनाथ कसपटे हे भारतातले सीताफळाचे पेटंट घेणारे पहिले शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या NMK Golden या सीताफळाला केंद्रसरकारच्या 'प्रोटेक्शन ऑफ प्लान्ट व्हरायटी अँड फार्मर्स राईट्स' यांच्याकडून 2019 ला पेटंट मिळालंय. त्यांच्या नर्सरीतली सीताफळं देशातच नव्हे तर दुबई, मस्कत आणि युरोपातही एक्सपोर्ट होतात.

सीताफळामध्ये ते नवनवीन प्रयोग करत असतात. तसंच सीताफळाच्या विविध जातींचाही त्यांनी शोध लावला आहे. त्यांच्या या कार्यासाठी 2015 साली केंद्र सरकारचा पीक वाण संरक्षणाचा 'प्लँट जिनोम सेव्हीयर फार्मर' हा पुरस्कार त्यांना मिळालाय.

तर केवळ 10 वी पास असलेल्या नवनाथ यांना 'एनएमके १ गोल्डन'च्या संशोधनाबद्दल बेंगळुरूच्या नॅशनल व्हर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर अॅग्रो एज्युकेशनकडून डॉक्टरेट मिळाली आहे.

रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे