You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संपूर्ण काश्मीर भारतात दाखवलं आणि दोघांची नोकरी गेली
पाकिस्तानचं सरकारी टीव्ही चॅनल पीटीव्हीने पाकिस्तानचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याच्या आरोपावरून आपल्या दोन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. या नकाशात पाकिस्तान दावा करत असलेला काश्मीरचा भाग भारताचा असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
या नकाशात पाकिस्तान दावा करत असलेला काश्मीरचा भाग भारताचा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पीटीव्हीवर हा नकाशा प्रसिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानात वाद निर्माण झाला होता. संसदेच्या वरीष्ठ सभागृहात 8 जून रोजी या विषयावर चर्चा झाली.
यानंतर सभागृहाचे अध्यक्ष सादिक संजरानी यांनी हे प्रकरण संसदीय समितीकडे पाठवून दिलं होतं.
सोशल मीडियावर पीटीव्हीवर टीका
याप्रकरणी वाद वाढल्यानंतर बुधवारी पीटीव्हीने दोन कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटवल्याची माहिती ट्विटरवर दिली. 6 जूनला पीटीव्ही न्यूजवर पाकिस्तानचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध होण्यासाठी जबाबदार दोन अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे, असं पीटीव्हीने सांगितलं.
- वाचा-मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा- लॉकडाऊन – 5 : महाराष्ट्र अनलॉक होतोय, जून महिन्यात काय सुरू काय बंद?
- वाचा -कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा - महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान गावी जायला ई-पास कसा मिळवायचा?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
पाकिस्तान सरकारच्या काही मंत्र्यांनी याबाबत सोशल मीडियावर जोरदार टीका केली होती. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी हा मुद्दा मांडताना पीटीव्हीच्या महासंचालकांवर निशाणा साधला होता.
हे लज्जास्पद आहे. पीटीव्हीचे अध्यक्ष अर्षद खान बराच काळ चॅनलचे प्रमुख आहेत. मात्र आपण पीटीव्हीचे महासंचालक आहोत, दूरदर्शनचे नाही हे बहुधा ते विसरले असावेत.
भारत आणि पाकिस्तान
तर, हे निष्काळजीपणा आणि आळशीपणामुळे हे होत असल्याचं पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी म्हणाल्या आहेत.
शिरीन मजारी यांनी लिहिलं, "हे बिलकूल स्वीकारार्ह नाही. फक्त निष्काळजीपणा आणि आळशीपणामुळे असं होऊ शकतं. गूगलवरून नकाशा उचलला आणि न तपासता याचा वापर केला गेला. काही लोकांना नकाशाचं महत्त्वच माहीत नाही, याचा मला खेद वाटतो."
भारत आणि पाकिस्तानदरम्यान काश्मीरवरूनचा वाद जुना आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या हवामानाचा अंदाज देण्यावरून कुरबुरी वाढल्या आहेत. मागील महिन्यात भारताच्या सरकारी संस्थांनी पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील मीरपूर, मुजफ्फराबाद आणि गिलगिट-बाल्टीस्तानसारख्या परिसराची हवामानविषयक माहिती देण्यास सुरू केलं होतं.
पाकिस्तानने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यानंतर त्यांच्या देशातील सरकारी संस्थांनी भारताच्या काश्मीरसह पुलवामा, जम्मू आणि लडाखचं तापमान सांगणं सुरू केलं. दोन्ही देशातील काश्मीरची सीमारेषा जगातील सर्वाधिक सैन्य वावर असलेल्या सीमारेषांपैकी एक आहे.
भारताने ऑगस्ट 2019 मध्ये भारत प्रशासित काश्मीरचे विशेषाधिकार रद्द करून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवलेलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)