बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. बीबीसीला झाली 100 वर्षं, जाणून घ्या 10 रंजक गोष्टी

बीबीसी ही जगातील सर्वांत मोठी ब्रॉडकास्टिंग कंपनी आहे. तिची स्थापना 18 ऑक्टोबर 1922 ला लंडनमध्ये झाली होती. बीबीसीला एक मोठा विविधांगी आणि उत्साहवर्धक इतिहास आहे.

सुरुवातीच्या काळात काही रेडिओ स्टेशन बंद झाल्यावर मात्र बीबीसीने त्यांचं दैनंदिन रेडिओ स्टेशन 14 नोव्हेंबर 1922 ला लंडनमध्ये सुरू केलं.

रोज संध्याकाळी एक बातमीपत्र या स्टेशनवर यायचं. विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारावर हे बातमीपत्र सादर व्हायचं. त्यानंतर हवामान वार्तापत्र सादर व्हायचं. हे वार्तापत्र नॅशनल मेट्रॉलॉजिक सर्व्हिसतर्फे तयार केलं जायचं.

बीबीसीच्या शताब्दीच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या क्षणांवर, काही गोष्टींवर नजर टाकूया ज्यांनी बीबीसीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ला 100 वर्षं पूर्ण झाली आहेत. जाणून घ्या, बीबीसीबद्दल 10 रंजक गोष्टी..

2. युकेच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर नवे पंतप्रधान कोण?

युकेच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. त्यांना पंतप्रधानपदावर येऊन फक्त 45 दिवस झाले होते.

त्यांची नवी कर प्रणाली वादात सापडल्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सहन करावा लागला होता.

त्यांनी सत्तेत येताच नवी कर प्रणाली आणत करांमध्ये मोठी कपात केली होती. ज्यानंतर त्यांना सर्वच स्तरातून मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

विरोधक आणि त्यांच्याच पक्षातल्या खासदारांनी त्यांच्या या कर प्रणालीला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना ती मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती.

3. दिवाळीत सूर्यग्रहण, ग्रहणाबद्दलच्या 'या' समजुती किती खऱ्या, किती खोट्या?

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्याबद्दल आपल्याकडे अनेक समजुती आहेत. काय करावं, काय करू नये, याबद्दल भरपूर सल्ले दिले जातात.

25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होणार आहे. म्हणजे दिवाळी पाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण येईल. हे फार दुर्मिळ असल्याने सोशल मीडियावर बरेच लोक आधीच काय करावे आणि काय करू नये हे सांगत आहेत.

या निमित्ताने काही प्रचलित समजुती आणि त्यांची सत्यता लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे. जाणून घ्या - ग्रहणाबद्दलच्या 'या' समजुती किती खऱ्या, किती खोट्या?

4. जाने भी दो यारों: सात लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेला 'कल्ट' क्लासिक

ऐंशीच्या दशकात सिनेसृष्टीमध्ये श्रीदेवीचा उदय झाला झाला होता. जितेंद्र आणि श्रीदेवीच्या चित्रपटांची क्रेझ होती. तोहफा चित्रपट तर प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट समजला जात होता.

वेगवेगळ्या रंगांच्या माठांपासून तयार केलेल्या सेटवर डान्स करणाऱ्या श्रीदेवी आणि जितेंद्र यांचं, 'तोहफा... तोहफा' हे गाणं तेव्हापासून आजपर्यंत एवढी वर्ष मनोरंजक सिनेमासाठी आदर्श समजलं जात आहे.

पण तेव्हाची परिस्थिती पाहिली तर, एक नवे दिग्दर्शक कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारो' हा चित्रपटही 'तोहफा' चित्रपटाबरोबरच प्रदर्शित होणार होता. सात लाखांपेक्षाही कमी बजेट मध्ये बनलेला हा चित्रपट 40 वर्षांनंतर आजही अजरामर आहे. जाणून घ्या या कल्ट चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी..

5. तुम्ही फक्त पाच तास किंवा त्यापेक्षाही कमी वेळ झोपत असाल तर...

वयाच्या पन्नाशीनंतर जर तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा धोका कमी करायचा असेल तर त्यासाठी किमान पाच तास झोप घेणं आवश्यक असल्याचं एका संशोधनातून दिसून आलंय.

संशोधक सांगतात त्याप्रमाणे, आजारी व्यक्तींना झोप येत नाही. मात्र झोपच येत नाही ही समस्या एखाद्या आजाराची पूर्वसूचना किंवा धोका असू शकतो.

झोपेमुळे मन ताजंतवानं होतं, शरीराला आराम मिळतो. पण झोप नेमकी घ्यायची किती याविषयी अजूनतरी काही ठोस माहिती मिळत नाही.

ब्रिटनच्या पीएलओएस मेडिसिन संस्थेने नागरी सेवकांच्या आरोग्याचं आणि झोपेसंबंधीचं संशोधन केलं आहे.

जाणून घ्या, तुम्ही फक्त पाच तास किंवा त्यापेक्षाही कमी वेळ झोपत असाल तर...तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल?

बीबीसी मराठीचे व्हीडिओ, जे तुम्ही नक्की पाहायला हवेत -

1. शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष होणार, चीन-भारत संबंधांवर काय परिणाम होईल? | सोपी गोष्ट 709

2. दिवाळीचा फराळ शिकणाऱ्या पुरुषांची गोष्ट

3. आग लागली आणि महाकाय मशिदीचा घुमट कोसळला

4. शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार? पावसामुळे सोयाबीनचं पीक वाया गेलं..

5. अमरावतीत पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवतानाची थरारक दृश्यं

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)