You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC Marathi वरील मागील आठवड्यातले खास लेख, जे कदाचित तुमच्या नजरेतून सुटले असतील
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी...
1. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राऊतांना व्हिलन का ठरवत आहेत?
शिंदे सरकार स्थापनेनंतर त्यांच्या गटातल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी संजय राऊतांन लक्ष्य केलं आहे. जणू सगळ्या बंडाच्या काळात जे काही त्यांनी आत दाबून ठेवलं होतं ते आता बाहेर येतं आहे. राऊतांच्या शब्दांच्या बाणांनी केलेल्या जखमा किती खोलवर गेल्या होत्या हे त्यावरून स्पष्ट दिसतंय.
राग स्पष्ट दिसतोय, जाणवतोय. एकटे शहाजी पाटीलच बोलताहेत असं नाही. तर सगळेच आमदार बोलताहेत. संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दीपक केसरकर अशी मोठी यादी आहे. कोणीच मागे नाही. पण बंडखोर आमदार संजय राऊत यांना व्हिलन ठरवत आहेत?
2. ऋषी सुनक कोण आहेत? त्यांनी ब्रिटनच्या अर्थमंत्रिपदाचा राजीनामा का दिला?
क्रिस पिंचर प्रकरणानंतर मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री 11 च्या सुमारास अर्थमंत्री ऋषी सूनक यांनी त्यांच्या अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
ब्रिटनमध्ये जन्मलेले ऋषी सुनक गेल्या वर्षी रिचमंडमधून (यॉर्क्स) दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. जाणून घेऊ त्यांच्याविषयी या लेखात..
3. शमिता शेट्टी म्हणते, मी जर 'आंटी' असेन तर, तुम्ही..
'बिग बॉस'च्या घरात शमिता शेट्टीला अनेकदा 'एज शेमिंग'ला म्हणजेच वयावरून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांनाही सामोरं जावं लागलं होतं. बिग बॉस-15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आणि शमिता शेट्टी यांच्यात अनेकदा वाद आणि भांडणंही झाली. शोमध्ये असताना आणि बाहेर पडल्यावरही ती याबद्दल बोलली होती.
बीबीसी हिंदीने शमिता शेट्टीसोबत संवाद साधला. यावेळी शमिता शेट्टीनं 'एज शेमिंग'सोबतच डिप्रेशन, बिग बॉस आणि आपल्या कुटुंबाबद्दलही मोकळेपणानं चर्चा केली. वाचा सविस्तर मुलाखत..
4. पाकिस्तानच्या नोटा जेव्हा नाशिकच्या या छापखान्यात छापल्या जायच्या... पाहा फोटो
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतरही काही काळ नाशिक इथल्या नोटांच्या छापखान्यात पाकिस्तान सरकारसाठी नोटा छापल्या जात होत्या.
त्यावर उर्दू भाषेत अक्षरं छापलेली होती. पाकिस्तान सरकारच्या या नोटा नाशिकमधील एका प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. पाहूया पाकिस्तानच्या नाशिकमध्ये छापल्या जाणाऱ्या नोटा -
5. वजन कमी करायचं असेल तर सकाळचा नाश्ता करावा की टाळावा?
सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे असतातच, असं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते सकाळच्या नाश्त्यात कॅल्शियम आणि फायबर या घटकांचं अधिक प्रमाण असतं. नाश्ता केल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांना खासकरून सकाळच्या नाश्त्याचा भरपूर फायदा होतो.
नाश्त्यामधून तुम्हाला उर्जा आणि आवश्यक पोषकतत्त्वं मिळतात. तसंच तुम्हाला सारखं खाण्याची गरज भासत नाही. आतापर्यंतच्या अनेक संशोधनांमधून असंच दिसून आलंय की सकाळी नाश्ता केल्यानं तुम्ही ठणठणीत राहता.
पण वजन कमी करायचं असेल तर नाश्ता फायद्याचा ठरतो का? सकाळचा नाश्ता जेवणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो का? वजन कमी करण्याचा संकल्प केलाय? मग हे नक्की वाचा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)