You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऋषी सुनक कोण आहेत, जे यूकेच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेत आले आहेत...
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पंतप्रधानपदावर येऊन फक्त 45 दिवस झाले होते. त्यांची नवी कर प्रणाली वादात सापडल्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सहन करावा लागला होता.
लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर एका आठवड्यात आम्ही पुढचा नेता निवडू असं हुजूर पक्षानं स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे, सोशल मीडियावर ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. बोरिस जॉन्सन यांच्यानंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिझ ट्रस यांच्यासोबत ऋषी सुनक हेही होती.
40 वर्षीय ऋषी सुनक इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
ऋषी सुनक कोण आहेत?
ब्रिटनमध्ये जन्मलेले ऋषी सुनक गेल्या वर्षी रिचमंडमधून (यॉर्क्स) दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले.
ते सरकारमध्ये आधी ज्युनिअर मंत्री होते. त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं होतं.
त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई फार्मसी चालवायच्या. त्यांची पत्नी अक्षता इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.
अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.
ऋषी सुनक यांचे आई-वडील त्यांच्या आजी-आजोबांसोबत ब्रिटनला गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.
त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.
राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती.
ब्रेक्झिटचे समर्थक
ऋषी सुनक यांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने प्रचार केला होता. त्यांच्या मतदारसंघातही 55 टक्के लोकांनी ब्रेक्झिटच्या बाजूनेच कौल दिला होता.
ते विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या सुरुवातीपासूनच्या समर्थकांपैकी एक आहेत.
कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उदयोन्मुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रिचमंड यांच्यापूर्वीचे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते लॉर्ड हेग यांनी ऋषी सुनक 'असामान्य व्यक्ती' असल्याचं म्हटलं होतं.
ऋषी सुनक यांच्या वेबसाईटनुसार फिट राहण्यासोबतच त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि सिनेमे बघायला आवडतं.
ते लहान असताना साउथॅम्पटनेच फुटबॉल खेळाडू मॅट ले टिजीअर त्यांचे हिरो होते.
'पहिल्या पिढीतले NRI'
आपली आशियाई ओळख आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचं ऋषी सुनक यांनी म्हटलेलं आहे.
ते म्हणाले होते, "मी पहिल्या पिढीचा NRI आहे. माझे कुटुंबीय इथे आले होते. त्यामुळे तुम्हाला त्या पिढीचे लोक भेटले आहेत जे इथे जन्मले. त्यांचे कुटुंबीय इथे जन्मलेले नाहीत आणि ते या देशात त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी आले होते."
"मी दर विकएंडला मंदिरात जातो. मी हिंदू आहे. मात्र, शनिवारी सेंट गेममध्ये जातो."
ऑक्टोबर 2019 ला बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, "मी खूप सुदैवी आहे की मला वंशवादाचा फारसा सामना करावा लागलेला नाही. मात्र, एक घटना माझ्या मनातून जात नाही."
"मी माझ्या धाकट्या बहीण-भावासोबत बाहेर गेलो होतो. मी तेव्हा लहान होतो. कदाचित 15-17 वर्षांचा असेल आम्ही एका फास्ट फूट रेस्टोरंटमध्ये गेलो आणि मी त्यांना सांभाळत होतो. काही लोक तिथे बसले होते आणि पहिल्यांदाच वाईट शब्दांचा सामना केले. तो एक 'पी' शब्द होता."
मात्र, आजच्या ब्रिटनमध्ये त्याची कल्पनाही करता येत नसल्याचंही ते सांगतात.
साजिद जाविद यांचे पंतप्रधानांशी मतभेद
माजी अर्थमंत्री साजिद जाविद आणि पंतप्रधानांचे सल्लागार डॉमनिक कमिंग्ज यांच्यात तणाव सुरू होता आणि म्हणूनच साजिद जाविद यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं.
साजिद जाविद यांच्याशी संबंधित सूत्राने सांगितलं, "त्यांनी अर्थमंत्री हे पद सोडलं. पंतप्रधानांनी त्यांना आपल्या सर्व विशेष सल्लागारांना काढून पंतप्रधान कार्यालयातील विशेष सल्लागारांना नियुक्त करण्यास सांगितलं होतं. मात्र, स्वाभिमान जागृत असलेला कुठलाही मंत्री असं करणार नाही, असं साजिद जाविद यांनी म्हटलं होतं."
साजिद जाविद यांच्या राजीनाम्यावर लेबर पक्षाचे खासदार मॅकडोनल्ड म्हणाले, "सत्तेत आल्यावर दोनच महिन्यात संकटात सापडलेल्या सरकारचा हा एक ऐतिहासिक विक्रम असेल. डॉमिनिक कमिंग्ज यांनी अर्थ मंत्रालयाचं संपूर्ण नियंत्रण मिळवण्याची लढाई जिंकली आहे, हे स्पष्ट दिसतंय."
प्रिती पटेल आणि आलोक शर्मा
गृहमंत्री प्रिती पटेल यांचा जन्म लंडनमधलाच. त्यांचे आई-वडिल मूळ गुजरातचे आहेत. मात्र, गुजरातहून ते युगांडाला गेले.
प्रिती पटेल गेल्या वर्षी जुलैमध्ये ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या पहिल्या गृहमंत्री बनल्या.
बोरीस जॉनसन यांचे नवे बिझनेस मंत्री आलोक शर्मा पूर्वी याच सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय विकास मंत्री होते.
51 वर्षांचे आलोक शर्मा यांचा जन्म आग्र्यात झाला. मात्र, ते पाच वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील ब्रिटनच्या रेडिंगला गेले होते.
आलोक शर्मा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. राजकारणात येण्यापूर्वी तब्बल 16 वर्ष ते बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)