पाकिस्तानच्या नोटा जेव्हा नाशिकच्या या छापखान्यात छापल्या जायच्या... पाहा फोटो

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, पाकिस्तान सरकारसाठी नोट
    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतरही काही काळ नाशिक इथल्या नोटांच्या छापखान्यात पाकिस्तान सरकारसाठी नोटा छापल्या जात होत्या. त्यावर उर्दू भाषेत अक्षरं छापलेली होती. पाकिस्तान सरकारच्या या नोटा नाशिकमधील एका प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, गव्हर्नर सी. डी. देशमुख यांची स्वाक्षरी असलेली पाकिस्तानची नोट

पाकिस्तानच्या नोटांवर तत्कालीन गव्हर्नर सी. डी. देशमुख यांची स्वाक्षरी दिसते. ब्रिटीश सरकारच्या काळात तिसरे गव्हर्नर म्हणून देशमुख यांची नियुक्ती झाली होती. पुढे स्वतंत्र भारतात ते अर्थमंत्री झाले.

नाशिक करन्सी नोट प्रेस म्हणजेच छापखान्यात पाकिस्तान सरकारसाठी छापल्या गेलेल्या या दोन रूपयांच्या या नोटेवर किंग जॉर्ज पाचवे यांचं चित्र आहे.

भारतीय रिझर्व बँकेकडून पाकिस्तानची बँकिंग व्यवस्था पाहिली जायची, म्हणजेच पाकिस्तान सेंट्रल बँक सुरू होईपर्यंत. फाळणीपासून पुढे सप्टेंबर 1948 पर्यंत म्हणजे जवळपास एक वर्ष पाकिस्तानच्या नोटा नाशिकमध्ये छापल्या जात होत्या. तसा करारच झाला होता.

या नोटांवर पाकिस्तान गव्हर्नमेंट आणि उर्दूमध्ये सल्तनत-ए-पाकिस्तान असं छापलेलं असायचं. पुढली काही वर्षं या नोटा चलनातही होत्या.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नुकतंच एक प्रदर्शन झालं. तिथे जवळपास 1861 पासून ब्रिटिशांनी छापलेल्या चलनी नोटांपासून ते सध्या चलनात असलेल्या नोटा दाखवण्यात आल्या. पाहून आश्चर्य वाटेल अशा एक से एक नोटा इथे मांडण्यात आल्या होत्या.

एकदाच वापरून फाडून टाकली जाणारी तसंच हाताने बनवलेली नोट अशा अनेक प्रकारच्या नोटा पाहायला मिळाल्या.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

बर्मा म्हणजेच म्यानमारसाठीही नाशिकच्या छापखान्यात 1946 पर्यंत नोटा छापल्या जात असत.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, म्यानमारची 10 हजारची नोट

1940 साली 10 हजारची नोट छापलेली नोट, बर्मा देशाचा उल्लेख आणि काही मजकूर सोडला तर या नोटेची डिझाईन बरीचशी भारतीय नोटेसारखी होती.1935 मध्ये बर्मा भारतापासून वेगळा झाला होता. भारतात छापलेल्या चलनातील नोटा पुढे देशाने 1950 बाजारातून काढून घेण्यात आल्या.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, 1 रुपयाची उस्मानिया नोट

हैदराबाद सल्तनत म्हणजेच निजाम राजवटीसाठी छापलेली 1920 ची 1 रुपयाची उस्मानिया नोट ही इथे आहे. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी उस्मानिया चांदीचं नाणं मिळायचं. महायुद्धानंतर चांदी मिळणं अवघड झालं. लंडनमधील खाजगी कारखान्यात निजामाच्या उस्मानिया चलनी नोटा छापल्या जायच्या, मात्र 1920 पासून निजाम बँक ऑफ इंग्लंडकडे नोटा छापू लागला.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, निजामाचं उस्मानिया चलन

हैदराबादच्या निजामासाठी 1938 मध्ये नवीन डिझाईन केलेल्या 5 आणि 10 रूपयाच्या नोटा छापल्या गेल्या. यावर संपूर्ण माहिती उर्दू भाषेत होती. हे उस्मानिया चलन म्हणून प्रचलित होतं. 1939 साली 1000 ची नोट छापली. या नोटा निजाम संस्थान खालसा होईपर्यंत म्हणजेच 1948 चलनात होत्या.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, चीनसाठी नोटा

1940 साली नाशिकमध्ये 10 युहाण ह्या मूल्याची चीन सरकारची नोट छापण्यात आली होती, या नोटवर सन यात-सेन यांचं चित्र दिसतं.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, श्रीलंकेचं चलन

जुन्या सिलोन, आताच्या श्रीलंका सरकारसाठी 1940 आणि 1941 मध्ये वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा छापण्यात आल्या.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, पूर्व आफ्रिकेतील चलन

ईस्ट आफ्रिका करन्सी बोर्ड ह्या आफ्रिकन देशासाठी 5 व 20 शिलिंग ह्या मूल्यांच्या नोटा छापण्यात आल्या. या नोटांवर तेथील करन्सी बोर्ड सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, इराकच्या नोटेवर बेबी किंग फैसल

इराकच्या नोटेवर एका लहान मुलाचं चित्र होतं. ही नोट देखील प्रदर्शनात होती.

1931 मध्ये छापखान्यात इराकचं दिनार हे चलन छापण्यात आलं. एखाद्या लहान मुलाचं चित्र असलेली जगातली ही पहिलीच नोट होती. बेबी किंग फैसल द्वितीय हे वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर वारस म्हणून ते गादीवर बसले. याच 13 वर्षाच्या बालकाचं चित्र असलेल्या नोटेची किंमत 30 लाख इतकी आहे.

अशा पूर्व आफ्रिका, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, चीन, इराण या परदेशातलं चलन नाशिकच्या प्रेसमध्ये छापण्यात येत होतं.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांचं चित्र असलेलं 1948 साली छापलेलं नेपाळचं चलन.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, बांगलादेशचं टका चलन

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तिथल्या टका चलनाच्या नोटाही नाशिकमध्येच छापल्या जात होत्या.1 टका, 5 टका,10 टका ते 100 टका या बांगलादेशी चलंनाच्या नोटांवर त्या देशाचा नकाशा आणि शेख मुजिरबार रहमान यांचा फोटो होता.

भारतातली पहिली नोटबंदी

ईस्ट इंडिया कंपनीकडून 1861 साली इंग्लंडच्या राजवटीकडे भारताचं नियंत्रण गेलं आणि भारतीय कागदी चलन कायदा आला. तेव्हा नोटांवर व्हिक्टोरिया राणीचं चित्र असायचं. 1861 ते 1930 च्या काळात कागदी नोटा चलन म्हणून वापरण्याची पद्धत भारतात रूजली.

त्या पूर्वी भारतात नाणी आणि सुवर्णमुद्रा वापरल्या जायच्या. भारतीय लोकांना नाण्यांवर जास्त विश्वास असल्याने भारतात चलनी नोटांमध्ये व्यवहार व्हायला कित्येक वर्ष लागली.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, नोटेवरील आठ भाषा

1914 साली 5 रुपयाची नोट आली. या नोटेवर पहिल्यांदाच आठ भारतीय भाषांमध्ये मूल्य छापलेलं दिसतं.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, 1 रुपयाची नोट

1917 मध्ये 1 रुपया व अडीच रुपये (2 रुपये आठ आणे) दोन्ही बाजूंनी प्रिंट केलेल्या नोटा आणल्या गेल्या, यावर मागील बाजूस आठ भाषांमध्ये मूल्य छापले होते, तर पुढील बाजूस राजा जॉर्ज पंचम याचे चित्र व मागील बाजूस इंग्लंडच्या राजसत्तेचे प्रतीक crown आणि GRI असे छापले गेले, राजवस्त्र असलेला मुकुट वॉटर मार्क ही अधिकची सुरक्षा मानकं होते.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, अडिच रूपयाची नोट

पहिल्या महायुद्धात (1914-1918) इंग्लंडमधून जहाजं भारतात येणं अवघड झालं. ही जहाजं बुडविली गेली, काही लुटली गेली. त्यामुळे इंग्रजांनी भारतात छापखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका

भारतात 1925 साली संपूर्ण सर्वेक्षण केल्यानंतर नाशिकची निवड झाली आणि चलनी नोटा छापखान्याची उभारणी सुरू झाली. 14 एप्रिल 1928 या दिवशी छापखान्याचं उद्घाटन झालं.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

छापखान्यात सर्वांत पहिली छापली गेली ती उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका. त्यावेळी मुंबईवरून खास ट्रेन नाशिक रोडला गेली होती. ही पत्रिका आणि त्या दिवसाचे मेनू कार्ड अजूनही छापखान्यात आहे.

याच कारखान्यात 1927 साली पहिल्यांदाच 100 रूपये मुल्याची छापलेली नमूना नोट अजून आहे.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

भारतात रिजर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयची 1935 साली स्थापना झाल्यानंतर ब्रिटीश सरकारने चलनाचं नियंत्रण आरबीआयकडे दिलं. पुढे बँक ऑफ इंग्लंडचा करार संपला आणि नाशिक छापखान्याने नोटांची छपाई सुरू केली.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press

फोटो कॅप्शन, पाच हजाराची नोट

आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते सर ओसबॉर्न स्मिथ. त्यानंतर 1939 पासून आरबीआयचे द्वितीय गव्हर्नर सर जे. बी. टेलर यांच्या स्वाक्षरीने नोटा छापण्यात आल्या. पण एक गंमत म्हणजे 1 रुपयाची नोट मात्र त्यावेळे च्या अर्थखात्याच्या सचिवांच्या स्वाक्षरीने जारी झाली. आजही ती परंपरा कायम आहे. तेव्हा पाच हजार आणि दहा हजार या मोठ्या मूल्यांच्या नोटा आणल्या गेल्या.

Currency Note Press

फोटो स्रोत, Currency Note Press Nashik

फोटो कॅप्शन, 10 हजाराची नोट

भारतातील 10 हजार रुपये मूल्य असलेली नोट 1939 मध्ये आली. या नोटेचा आकार मोठा होता साधारणपणे 8 इंच लांबी आणि 6 इंच रुंदी इतका. सुरक्षितता मानकं म्हणून वॉटरमार्क असलेल्या दोन खिडक्या होत्या. या नोटा 1917 पासून चलनात होत्या.

पण ब्रिटीश सरकारने काळा पैसा म्हणजेच अघोषित धनाच्या शोधासाठी 1946 साली 1 हजार आणि 10 हजार या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. तेव्हा 10 हजारची नोट व्यवहारातून बाद झाली. भारतातील ही पहिली नोटबंदी होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)